scorecardresearch

बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

Nora Fatehi Birtdhay: सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला दिलेल्या महागड्या भेटवस्तू

nora fatehi sukesh chandrashekhar
नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा आज वाढदिवस आहे. तेलुगु चित्रपटांमध्ये आयटम साँगद्वारे मनोरंजन विश्वात पाऊल टाकणाऱ्या नोराने बॉलिवूडमध्ये नृत्य व अभिनय कौशल्याच्या जोरावर नाव कमावलं. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी नोरा सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.  

२०० कोटी घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी नोराचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्यांच्यामधील चॅटही समोर आले होते. सुकेशने नोराला बीएमडब्ल्यू एस सीरिज ही गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. “नोराकडे असलेली मर्सिडीजची CLA गाडी फार स्वस्त आहे, असं तिला वाटायचं. खरं तर मला तिला रेंज रोव्हर गिफ्ट करायची होती. पण त्यावेळी त्या गाड्या उपलब्ध नसल्याने आणि नोराला लगेचच गाडी हवी असल्याने मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज ही गाडी घेऊन दिली होती”, असं सुकेश चंद्रशेखरने म्हटलं होतं. याबरोबरच त्याने अनेक महागड्या वस्तू नोराला भेट म्हणून दिल्या होत्या.

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: दाल-बाटी, २० प्रकारचे गोड पदार्थ अन्…; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात पंजाबी-राजस्थानी पदार्थांची मेजवानी

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

नोराने गाडीबरोबरच घरासाठीही पैसे घेतल्याचा दावा सुकेशने केला होता. सुकेशने घर देणार असल्याचं वचन दिलं होतं, असा खुलासा करत नोराने त्याच्याविरोधात साक्ष दिली होती. नोराचे आरोप फेटाळून लावत सुकेशने तिला घर घेण्यासाठी पैसे दिल्याचं म्हटलं होतं. “मी तिला घर देणार असल्याचं वचन दिल्याचं नोराने सांगितलं. पण, तिने माझ्याकडून आधीच घरासाठी मोठी रक्कम घेतली आहे. कुटुंबियांसाठी मोरोक्को येथे घर खरेदी करण्यासाठी नोराने माझ्याकडून पैसे घेतले होते. ईडीच्या कायद्यातून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी नोरा असं म्हणत आहे”, असं सुकेशने म्हटलं होतं.

हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराचा बॉलिवूड गाण्यांवर डान्स; पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सुकेश चंद्रशेखरने महागडे गिफ्ट देऊन अनेक अभिनेत्रींना त्याच्या जाळ्यात ओढलं होतं. सुकेळ व जॅकलिन फर्नांडिस रिलेशनशिपमध्ये असल्याचंही समोर आलं होतं. त्यादरम्यान नोरा जॅकलिनचा खूप राग करायची असा खुलासाही सुकेशने केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 13:54 IST
ताज्या बातम्या