Before Vidya Balan This Actress Was First Choice For Raja Shivaji : हिंदी व मराठी चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वीच काही दिवसांपासून चित्रपटाबद्दल चर्चा सुरू होती. आता बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात मराठीसह हिंदीतीलही अनेक बडे कलाकार आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन यांसारखे अनेक बॉलीवूड कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. तर महेश मांजरेकर, जीतेंद्र जोशी यांसारखे लोकप्रिय मराठी कलाकारसुद्धा आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का ‘राजा शिवाजी’मध्ये विद्या बालनने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला पहिली पसंती नव्हती. तर तिच्या जागी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला पहिली पसंती होती.

तब्बूला होती पहिली पसंती, का दिला नकार?

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात विद्या बालनने मोठ्या बेगमची भूमिका साकारली आहे, पण या भूमिकेसाठी ती पहिली पसंती नव्हती. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या रिपोर्टनुसार, विद्या बालनच्या आधी हा रोल बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ला ऑफर करण्यात आला होता. चित्रपटाशी संबंधित एका सूत्रानेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मात्र, तारखा जुळत नसल्यामुळे तब्बूने हा रोल नाकारला. त्यानंतर रितेशने विद्या बालनशी संपर्क साधला आणि ती लगेच या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात विद्या बालनच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. बडी बेगमच्या भूमिकेत प्रेक्षकांना ती खूप आवडली आहे. बडी बेगम वीजापूर संस्थानातील एक प्रभावशाली व्यक्ती होती. ती अशी राणी होती, जिने छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध केला होता. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, फरदीन खान, भाग्यश्री आणि बोमन इराणी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

‘भूल भुलैया ३’मधूनही तब्बूने घेतली माघार 

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’पूर्वी तब्बूने कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची ऑफरही नाकारली होती. याआधी तिने ‘भूल भुलैया २’मध्ये अंजुलिका आणि मंजुलिका असे दुहेरी रोल साकारले होते, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. म्हणूनच तिसऱ्या भागात पुन्हा तसाच रोल करण्यात फारसं नवीन आव्हान उरलं नसल्याने तिने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर हा चित्रपट विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्याकडे गेला. असं म्हटलं जातं.