Premium

“ओडिशा रेल्वे अपघाताने हे सिद्ध झालंय की बुलेट ट्रेन…”, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत, म्हणाला…

Odisha Train Derailed : ओडिशा रेल्वे अपघातानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

odisha-train-accident (3)
ओडिशा रेल्वे अपघातानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ओडिशा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आत्तापर्यंत जवळपास २८८ प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. तर एक हजाराहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. हा गेल्या दोन दशकातील सर्वात भीषण अपघात आहे. तीन रुळांवरून धावणाऱ्या तीन ट्रेन एकाचवेळी एकमेकांवर धडकल्याने ट्रेनचे डबे रुळांसकट बाजूला फेकले गेले. या रेल्वे अपघातानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमल आर खानने(केआरके) ओडिशा रेल्वे अपघातानंतर ट्वीट केलं आहे. “ओडिशा रेल्वे अपघाताने हे सिद्ध केलं आहे की बुलेट ट्रेन देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कमी गतीच्या ट्रेनचा वापर केला गेला पाहिजे. जीव असेल, तर जीवन आहे,” असं ट्वीन केआरकेने केलं आहे. ओडिशा रेल्वे अपघातानंतर केआरकेने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ : सई आणि शरयू ठरल्या विजेता, बक्षिसाची रक्कम जाणून घ्या

अपघात कसा झाला?

ओडिशामधील बालासोर येथे शुक्रवारी(३ जून) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे दोन रेल्वे एकाच रुळांवर आल्याने मोठा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धकल्याने दोन्ही गाड्यांचे डबे रुळांवरून घसरले. दरम्यान, डाऊन मार्गाने धावणाऱ्या हावडा एक्स्प्रेसला या अपघाताचा धक्का बसल्याने ही एक्स्प्रेसचे डबेही रुळांवरून घसरले. परिणामी तीन रेल्वेंची धकड होऊन मोठा अपघात झाला.

या अपघातानंतर जवळपास ४८ तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली होती. रविवारी(४ जून) रात्री उशीरा ओडिशाच्या बालासोर रेल्वे स्थानकावरू वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 10:31 IST
Next Story
दुसऱ्या लग्नाचा निर्णय सांगितल्यावर पहिली पत्नी व २२ वर्षांच्या मुलाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, आशिष विद्यार्थींचा खुलासा