Bollywood Old Movies Release : ‘जुनं ते सोनं’, असं कायमच म्हटलं जातं. मात्र, आधीच्या काळातील शंभर नंबरी सोनं असलेले काही चित्रपट जुने कधीच वाटत नाहीत. हे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहताना आधीसारखाच आनंद देतात. सध्या बरीच वर्षं लोटून गेलेले चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत आणि या सगळ्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. असेच एक काळ गाजवलेले चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात येत्या ३० ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यात एका मराठी चित्रपटाचाही समावेश आहे.

९० च्या दशकातील चित्रपट असो किंवा १० ते १५ वर्षांपूर्वी झालेले प्रदर्शित झालेले चित्रपट असो; या चित्रपटांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. ‘गँग ऑफ वासेपुर’ आणि ‘रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटांना आताचा प्रेक्षकवर्गदेखील तेवढाच पसंती देतो. २०१२ मध्ये ‘गँग ऑफ वासेपुर’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सत्य घटनेवर आधारित आणि गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘गँग ऑफ वासेपुर’ पुन्हा प्रदर्शित होत असल्याचं कळताच चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटाने देखील तरुणाईला वेड लावलं. २० वर्षांचा काळ लोटूनही आर माधवनने साकारलेला मॅडी आणि दिया मिर्झाने साकारलेली रीना ही पात्र आजही तितकीच लोकप्रिय आहेत. हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेमात पाडण्यासाठी येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
The movie Ghaat will be released on September 27
‘घात’ चित्रपटाचे २७ सप्टेंबरला प्रदर्शन

हेही वाचा – Video: आर्या झाली अरबाजसाठी भावुक; नेटकरी म्हणाले, “हिने तर सगळेच…”

‘हा’ मराठी चित्रपटदेखील होणार प्रदर्शित

हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनात मराठी आणि कन्नड चित्रपटही काही मागे राहिलेले नाही. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या भयपट ‘तुंबाड’ने प्रेक्षकांची ‘वाह वाह’ मिळवली. चित्रपटातील हाच थरार पुन्हा अनुभवता यावा यासाठी ‘तुंबाड’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर कन्नड चित्रपट ‘करीया’ हादेखील येत्या शुक्रवारी पुन्हा प्रदर्शित होत आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता दर्शन याने मुख्य भूमिका साकारली होती.

हेही वाचा- Video: सलमान खानचा ‘जलवा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, मंचावर बसलेल्या अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया पाहिलीत का?

सध्या जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जात असून, प्रेक्षकदेखील या सगळ्याला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’ चित्रपटाला प्रेक्षक चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीत आहेत. २०१८ साली ‘लैला मजनू’ प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अभिनेत्री तृप्ती डिमरीने याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं; मात्र तिला खरी ओळख मिळाली ती रणबीर कपूरच्याा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील भूमिकेमुळे. तृप्तीचा फॅनफॉलोविंग मोठा असून, तिचा पहिलावहिला चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार असल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.