ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली. या चित्रपटातील व्हीएफएक्स प्रेक्षकांना अजिबात आवडले नाहीत. सर्व बाजूंनी होणारी टीका पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि व्हीएफएक्समध्ये बदल करण्यासाठी आणखीन वेळ घेतला. आता याबाबत या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याने भाष्य केलं आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर आता हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. गेली सहा महिने या चित्रपटाची टीम या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करत आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’चा होणार वर्ल्ड प्रीमियर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाला पाहता येणार चित्रपट?

याबाबत ‘पीटीआय’शी बोलताना ओम राऊत म्हणाला, “व्हीएफएक्ससाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात पण त्यामुळेच आपला चित्रपट आणखीन चांगला बनणार आहे. खास करून या अशा चित्रपटामध्ये जो भारतातील असा पहिलाच चित्रपट आहे ज्यात आम्ही मार्व्हल, डीसी आणि अवतार सारख्या बड्या हॉलीवुड चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

आता त्याचं हे बोलणं खूप चर्चेत आलं असून या चित्रपटाबद्दल चाहते उत्सुकता व्यक्त करत आहेत. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.