Premium

५०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या ‘आदिपुरुष’ने रचला इतिहास; प्रदर्शनाआधीच कमावले ‘इतके’ कोटी

काही ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट प्रदर्शनानंतर दक्षिणेत १८० कोटींची कमाई करेल

adipurush-collection
फोटो : सोशल मीडिया

साउथचा सुपस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जसजशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतशा या चित्रपटाबद्दलच्या नवनवीन गोष्टी उलगडत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशनबाबत एक मोठी बातमी समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते ‘आदिपुरुष’च्या प्री-इव्हेंटसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बजेटपैकी बरीचशी रक्कम परत मिळवली आहे.

आणखी वाचा : रणवीर सिंगच्या कारकिर्दीला नाही लागणार ब्रेक; ‘या’ पाच बिग बजेट चित्रपटात झळकणार अभिनेता

५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने तब्बल ४३२ कोटींची कमाई प्रदर्शनाआधीच केली आहे. Tollywood.net च्या अहवालानुसार, या चित्रपटाचे तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरीने १८५ कोटींना विकले आहेत. तर जीएसटी धरून ही रक्कम २४७ कोटी होत आहे. याखेरीज सॅटेलाइट, म्युझिक आणि डिजिटल हक्क मिळून तब्बल ४०० कोटींची कमाई ‘आदिपुरुष’ने प्रदर्शनाआधीच कमावले आहेत.

काही ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट प्रदर्शनानंतर दक्षिणेत १८० कोटींची कमाई करेल. इतकंच नव्हे तर हिंदीत हा चित्रपट केवळ तीन दिवसांतच १०० कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम् या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात उत्तम कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 18:14 IST
Next Story
पारंपरिक लूक, नवऱ्यावरचं प्रेम अन्…; जिनिलीया देशमुखचा वटपौर्णिमेचा उत्साह, रितेश म्हणतो, “बायको…”