दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यावरून प्रचंड गदारोळ माजला. यातील स्पेशल इफेक्ट आणि रावणाचा लूक यावरून लोकांनी या टीझरला प्रचंड ट्रोल केलं. हा चित्रपट बॉयकॉट करावा इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केलं आहे. सध्या या पोस्टरची चर्चा आहे. रामनवमीच्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ‘आदिपुरुष’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. अभिनेता प्रभास, सनी सिंह, क्रिती सेनॉन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसत आहे. "मंत्रो से बढके तेरा नाम जय श्रीराम" असा कॅप्शनदेखील दिला आहे. या पोस्टर विविध प्रतिक्रिया येत आहेत. Video : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज सूट होणार नाही, कारण…” अमोल कोल्हेंनी सांगितला ‘तो’ कटू प्रसंग हा चित्रपट सर्वप्रथम ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही तांत्रिक कारणास्तव आणि लोकांचा विरोध पाहता याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र टी-सिरिज आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली होती हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती. तसेच हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन सीता आणि अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेही ‘आदिपुरुष’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत आहे.