Govinda Affair: तीन दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या पायात गोळी लागली असून आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. गोविंदाची प्रकृती बरी असल्याचं त्याची पत्नी सुनिताने सांगितलं. गोविंदाच्या चांगल्या-वाईट काळात पत्नी सुनिता कायम त्याच्याबरोबर असते. मात्र एकेकाळी अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेल्या गोविंदाने सुनीताशी साखरपुडा मोडला होता.

गोविंदाने अभिनेत्री नीलम कोठारीमुळे सुनीताशी साखरपुडा मोडला होता, असा खुलासा त्यानेच १९९० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. गोविंदा व नीलमने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याचदरम्यान तो नीलमच्या प्रेमात पडला आणि सारखा तिचंच कौतुक करत असायचा. गोविंदाची नीलमशी वाढती जवळीक पाहून सुनीताला असुरक्षित वाटत होतं.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
neelam kothari
पतीने चित्रपटासाठी इंटिमेट सीनचे शूटिंग केल्यावर नीलम कोठारी झालेली नाराज; अभिनेता म्हणाला, “तिला एका मैत्रिणीने…”
the dirty picture vidya balan
‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

गोविंदा नीलमबद्दल काय म्हणाला होता?

“आमची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती, पण हळूहळू आमची मैत्री झाली आणि आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले. आम्ही अनेकदा भेटायचो. मी तिला जितकी जास्त ओळखू लागलो, तितकीच मला ती आवडू लागली. ती एक अशी स्त्री होती, जिच्या प्रेमात कोणताही पुरुष पडेल. मी तिच्या प्रेमात पडलो होतो,” असं गोविंदा नीलमबद्दल म्हणाला होता.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

नीलमचं गोविंदा करायचा कौतुक

गोविंदा नीलमचं खूप कौतुक करायचा आणि सुनिताला तिच्यासारखं व्हायला सांगायचा. “मी नीलमचं नेहमी कौतुक करत असायचो. माझ्या मित्रांना, कुटुंबाना आणि अगदी जिच्याबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होतो त्या सुनीताला मी बदलायला सांगितलं आणि तिला नीलमसारखं व्हायला सांगितलं होतं. मी तिला म्हणायचो की नीलमकडून काहीतरी शिक. त्यामुळे सुनीता नाराज व्हायची आणि म्हणायची की मी तीच आहे जिच्या प्रेमात तू पडलास, त्यामुळे मला बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मात्र मी गोंधळलो होतो, मला काय हवंय ते मला समजत नव्हतं”, असं गोविंदा म्हणाला होता.

बॉलीवूड अभिनेता पत्नीला म्हणतो, “…तर मी माधुरी दीक्षितशी लग्न केलं असतं”; धक धक गर्लच्या स्वभावाचं केलं कौतुक

सुनीताबद्दल गंभीर नव्हता गोविंदा

सुनीताला भेटल्यावर तिच्याबद्दल फार गंभीर नसल्याचं गोविंदाने सांगितलं होतं. रोमँटिक सीन करताना गोविंदा अनम्फर्टेबल झाला होता, त्यावेळी डेट करण्याचा सल्ला त्याच्या भावाने दिला होता. त्यावेळी तो सुनीताला भेटला होता.

sunita ahuja govinda neelam affair
गोविंदा व सुनीता आहुजा (फोटो – इन्स्टाग्राम)

साखरपुडा मोडला होता

एकदा सुनीताने गोविंदाला नीलमबद्दल काहीतरी म्हटलं आणि त्या रागात गोविंदाने साखरपुडा मोडला होता. “मी सुनीताला म्हटलं की मला सोडून दे. मी तिच्याशी साखरपुडा मोडला. तिने पाच दिवसांनंतर मला फोन केला नसता, तर आमच्यात गोष्टी नीट झाल्या नसत्या. मी कदाचित नीलमशी लग्न केलं असतं. हो. मला तिच्याशी लग्न करायचं होतं आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही,” असं गोविंदा म्हणाला होता.

हेही वाचा – “खेळ अजून संपलेला नाही”! Bigg Boss Marathi मध्ये परतणार रितेश देशमुख; म्हणाला, “या सीझनचा सर्वात मोठा धक्का…”

सुनीताला का सोडलं नाही?

नीलमच्या प्रेमात पडूनही सुनीताला का सोडलं नाही, हेही गोविंदानं सांगितलं होतं. “मी दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडलो होतो म्हणून, मी सुनीताला दिलेलं वचन विसरू शकत नाही. माणसाला कर्तव्याची जाणीव नसेल तर हे असंच चालू राहील,” असं तो म्हणाला होता. तसेच नीलमला त्याच्याशी लग्न करण्यात फारसा रस नव्हता, तिला करिअर करायचं होतं, असंही गोविंदाने नमूद केलं होतं.

गोविंदाने लग्न केल्यावर त्याबद्दल कुणालाच सांगितलं नव्हतं. नीलमला देखील याबाबत माहिती नव्हती. लग्न झालंय हे कळाल्यास त्याचा करिअरवर परिणाम होईल, असं वाटत असल्याने गोविंदाने लग्न लपवून दिलं होतं.