Premium

“माझं बॉबीवर खूप प्रेम होतं, पण…”; ५ वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलेलं ब्रेकअपचं कारण

बॉबी देओल आणि नीलम कोठारीचं ब्रेकअप कुणामुळे झालं होतं? अभिनेत्रीने स्वतःच केलेला खुलासा

bobby deol neelam kothari
बॉबी देओल, नीलम कोठारी

बॉलिवूड कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य व त्यांचे अफेयर नेहमीच चर्चेचा विषय असतात. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचे अफेयर खूप गाजले, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काही जोड्या लग्न करणार अशा चर्चा असताना विभक्त झाल्या. काहींच्या ब्रेकअपची कारणं समोर आली, पण काहिंची मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. अशीच एक जोडी म्हणजे नीलम कोठारी आणि बॉबी देओल. नीलम देओल कुटुंबाची धाकटी सून होणार असं म्हटलं जातं, पण अचानक दोघे वेगळे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – डेडलाइन, सलग ३० तास शुटिंग अन्…, ‘कुमकुम’ने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव

नीलम कोठारी बॉबी देओलबरोबर ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे प्रेमही सर्वश्रुत होते. नीलम धर्मेंद्रची धाकटी सून होणार असल्याची चर्चा बी-टाउनमध्ये होती. पण नंतर मात्र ते वेगळे झाले. दोघांनाही आपलं नात टिकवायचं होतं, पण ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्रीला समजलं की जर तिने बॉबीशी लग्न केलं असतं तर ती आनंदी राहिली नसती. बॉबीच्या आयुष्यात पूजा भट्टची एंट्री झाल्याने नीलमने ब्रेकअप केलं, अशा चर्चा होत्या. तर काहींच्या मते, धर्मेंद्र या दोघांच्या नात्यासाठी तयार नव्हते. पण या सर्व अफवांना खुद्द नीलमनेच पूर्णविराम दिला होता.

हेही वाचा – “माझ्याच बॉयफ्रेंडने…”, अक्षय कुमारने ट्विंकलला प्रपोज केल्यावर गर्लफ्रेंड शिल्पा शेट्टीने केले होते आरोप

“हो! बॉबी देओलवर माझं खूप प्रेम होतं, हे खरं आहे. पण आता मी आणि बॉबी वेगळे झालो आहोत. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही, परंतु आजूबाजूला अनेक निराधार अफवा पसरत आहेत, ज्याचा मी स्पष्टीकरण देऊन शेवट करू इच्छिते. लोकांनी खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, अशी माझी इच्छा आहे आणि त्या अफवांपैकी एक म्हणजे बॉबी आणि मी पूजा भट्टमुळे वेगळे झालो आहोत. आम्ही दोघांनी मिळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता,” असं नीलम म्हणाली होती.

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

पुढे नीलम म्हणाली होती की, “मला अचानक जाणवलं की मी त्याच्यासोबत कधीच आनंदी राहू शकणार नाही. हे कळायला पाच वर्षे लागणं खूप मोठा कालावधी आहे, हे मला माहीत आहे. मला उशीरा कळलं, पण मी ते स्वीकरलं आणि शक्य तितक्या लवकर आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी एकदा ठरवलं की तेच करते, त्यामुळे मी बॉबीशी याबद्दल बोलले आणि त्यानेही होकार दिला.”

बॉबीपासून विभक्त झाल्यानंतर खूप दुःख झालं होतं, कारण आम्ही जवळपास पाच वर्षे एकत्र होतो. पण वेळ हाच या सर्वांवर उपाय आहे. वेळेनुसार माणूस स्वतःला सावरतो आणि त्यातून बाहेर पडतो, असंही नीलमने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Once neelam kothari revealed why she broke up with bobby deol pooja bhatt hrc