सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल २३ जून रोजी लग्न करणार आहेत. सोनाक्षी व झहीरने अद्याप जाहीरपणे सांगितलं नसलं तरी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण ज्यांना आले आहेत, अशा पूनम ढिल्लों, डेजी शाह व हनी सिंग यांनी त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. ३७ व्या वर्षी लग्न करणाऱ्या सोनाक्षी एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल तिचे वडील काय विचार करतात याबाबत सांगितलं होतं.

सोनाक्षी व झहीर सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. या रविवारी २३ तारखेला ते मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच अभिनेत्रीची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की तिचे वडील तिच्या लग्नाबद्दल फारसे आग्रही नव्हते.

सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo

‘बॉलीवूड बबल’ला तिने तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सोनाक्षीच्या लग्नाबद्दल तिच्या कुटुंबाचा दृष्टीकोन काय आहे, हे तिने सांगितलं होतं. तिने अविवाहित राहावं असं तिच्या वडिलांना वाटतं, तर तिची आई अधूनमधून लग्नाचा सल्ला देते, असं सोनाक्षीने म्हटलं होतं. “माझ्या लग्नाचा निर्णय त्यंच्यावर (शत्रुघ्न सिन्हा) अवलंबून असेल तर मी लग्न करावं असं त्यांना कधीच वाटणार नाही. माझी आई कधी-कधी म्हणत असते की तू लग्न करून घ्यायला पाहिजे. पण मग मी तिला एक लूक देते आणि ती म्हणते अच्छा ठिक आहे,” असं सोनाक्षी त्या मुलाखतीत म्हणाली होती.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

लग्नाच्या निर्णयाबाबत आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोनाक्षीने आनंद व्यक्त केला, कारण लग्नाचा दबाव नसल्यानेच करिअरवर लक्ष केंद्रित करता आलं, असं ती म्हणाली होती. “मला आनंद आहे की त्यांनी मला स्वातंत्र्य दिलंय, जोपर्यंत मी तयार नसेन तोवर ते माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकून ‘लग्न कर बेटा’ असं म्हणणार नाहीत,” असंही सोनाक्षीने म्हटलं होतं.

“ती माझी एकुलती एक मुलगी आहे अन्…”, सोनाक्षी-झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले?

सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांची प्रतिक्रिया

“सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे अन् ती माझ्या खूप जवळ आहे. जर माझ्या मुलीचे लग्न होत असेल तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईल. सोनाक्षीला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि मी तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात आनंदी बाबा असेन,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते. तसेच तिच्या लग्नाची बातमी नाकारतही नाही आणि बातमीला दुजोरा देत नाही, असंही त्यांनी नमूद केलं होतं.