अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मुलांबरोबर अनेकदा दिसणारा ऑरहान अवत्रामणी, ज्याला ओरी म्हणून ओळखलं जातं, त्याने अभिनेत्री सारा अली खानबरोबरच्या मैत्रीचा एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. ओरीने एका पार्टीतील घटनेची आठवण सांगताना दावा केला की, साराने एका मुलीला खुर्चीवरून ढकललं होतं.
या घटनेनंतर त्याने त्या घटनेची सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली आणि नंतर त्याच्या व साराच्या मैत्रीत दुरावा आला. काही दिवसांपूर्वी त्याने अमृता सिंह यांच्याबद्दलही वक्तव्य केलं होतं. आता त्याने साराबद्दलही एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे. ओरीच्या म्हणण्यानुसार, तो आणि सारा एका पार्टीत बसण्यासाठी जागा शोधत होते. त्यावेळी त्यांना एका खुर्चीवर एक मुलगी बसलेली दिसली. साराने त्या मुलीला खुर्चीवरून ढकललं आणि त्यानंतर दोघेही तिथे बसले, मात्र, यानंतर परिस्थिती बिघडली तेव्हा त्या मुलीने साराऐवजी ओरीलाच जाब विचारला, असं त्याने सांगितलं.
ओरीचा साराबद्दल धक्कादायक खुलासा
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत ओरीने सारा अली खानबरोबरचा हा किस्सा खरंच खूप मजेशीर असल्याचं सांगितलं. तसेच, ही गोष्ट सारानेच घडवून आणली होती, असा दावाही त्याने केला. हा किस्सा सांगताना ओरी म्हणाला की, जेव्हा नंतर त्या मुलीने साराऐवजी त्यालाच जाब विचारला. त्यावेळी सारा आधीच खूप लोकप्रिय होती, तर तो तुलनेने अपरिचित होता, त्यामुळे सगळ्यांचा राग आणि त्याचा फटका त्यालाच बसला. ओरी म्हणाला, “मी जे केलंच नाही, त्याचीही मला शिक्षा भोगावी लागली,” असं म्हणत त्याने पुन्हा स्पष्ट केलं की त्या मुलीला खुर्चीवरून ढकलणारा तो नव्हता.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार जानेवारी २०२६मध्ये ओरीने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली होती, जी नंतर डिलीट करण्यात आली. या रीलमध्ये त्याने सारा, अमृता आणि पलक यांचा उल्लेख ३ सर्वांत वाईट व्यक्ती असा केला होता, सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी हा उल्लेख सारा अली खान, तिची आई अमृता सिंह आणि पलक तिवारी यांच्याबद्दल असल्याचं समजलं. यानंतर सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांनी ओरीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. मात्र, ओरीने दावा केला की, त्याने त्यांना आधीच अनफॉलो केलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेत्री अमृता सिंह यांनी त्याला खूप त्रास दिला ज्यामुळे त्याला खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं आणि त्याच्या आयुष्यातील तो सगळ्यात कठीण काळ होता असं म्हटलं होतं. उल्लेख केलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे.
