Orry Citizenship : बॉलीवूड सेलिब्रिटींचा ‘बेस्ट फ्रेंड’ ओरी हा नेहमी बॉलीवूड पार्ट्या व सेलिब्रिटींबरोबरच्या फोटोंमुळे चर्चेत असतो. आता त्याने अमेरिकेच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट करून मोठा खुलासा केला. ओरी हा भारतीय नागरिक नाही. ओरीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्याने कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोणाला मतदान केलं, हेदेखील पोस्टमधून सांगितलं आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीत ओरीनेही मतदान केलं. त्याने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. ओरीने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Guddi Maruti reveals shocking details about Divya Bharti death
“तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा – अमेरिकेत पुन्हा ट्रम्प! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड; कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव

ओरीने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मत दिलं. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर १५ फोटो शेअर केले आहेत. “आम्ही करून दाखवलं डोनाल्ड” असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. “२०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याचा मला अभिमान वाटतो”, असंही ओरीने लिहिलं आहे.

पाहा पोस्ट –

ओरीने भारतातूनच डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केलं. त्याने यासंदर्भातील कागदोपत्री प्रक्रिया पार पाडतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याचं मत पोहोचल्याचा मेल आला, त्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. एका फोटोत त्याने ट्रम्प यांना मत दिलं हेही दिसतंय. ट्रम्प यांचा फोटो असलेला एक टी-शर्टही ओरीच्या पोस्टमध्ये आहे. तसेच त्याने काही स्क्रीन शॉट्सही शेअर केले आहेत.

हेही वाचा – Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी एकाच रिपब्लिकन पक्षाचे’, ट्रम्प यांच्या विजयानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

Orry voted for donald trump
ओरीने डोनाल्ड ट्रम्प यांना केलं मतदान (फोटो- इन्स्टाग्राम)

ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. ओरी हा सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या फॅशन सेन्समुळे तर कधी बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये हँग आउट करताना दिसतो. त्याला बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंडही म्हटलं जातं. तो अनेक स्टारकिड्सचा जवळचा मित्रही आहे. तो काजोलची मुलगी नीसा देवगण, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान यांचा चांगला मित्र आहे. तसेच अंबानींच्या कार्यक्रमांमध्ये ओरीची उपस्थिती नेहमीच असते.

Story img Loader