scorecardresearch

Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणच्या मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष, अर्थ आहे फारच खास

दीपिका पदुकोणच्या टॅटूचा अर्थ आहे फारच खास

deepika padukone tattoo meaning
दीपिका पदुकोणच्या टॅटूचा अर्थ आहे फारच खास

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे ९५ वे वर्ष होते. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी सर्वच अर्थाने खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने चार चांद लावले होते. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचा छान गाऊन परिधान केला होता. त्याबरोबर तिने गळ्यात एक नाजूक नेकलेसही परिधान केला होता. दीपिकाचे ऑस्कर सोहळ्यातील या लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : Oscar Awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; भारताची ऐतिहासिक कामगिरी, दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले

दीपिकाने स्वत: इन्स्टाग्रामवर ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी दीपिका फारच सुंदर दिसत आहे. दीपिकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिच्या कानामागे असलेल्या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

दीपिकाने स्वत:च्या ब्रँडच्या नावाचा टॅटू केला आहे. यात 82.e असे लिहिले आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एक ब्यूटी ब्रँड सुरु केला आहे. याचे नाव 82.E असे ठेवले आहे. त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे. दीपिकाच्या या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 10:51 IST
ताज्या बातम्या