बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. असे अनेक क्रिकेटर्स झाले आहेत ज्यांनी फिल्म स्टार्सशी लग्न केले आहे. या यादीत अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स देखील आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण शोएब अख्तरचा अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर जीव जडला होता आणि त्याने तिला प्रपोज करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

शोएब अख्तरला सोनाली खूप आवडायची. त्याच्या पाकिटात तिचा फोटो होता. अनेकवेळा त्याच्या सहकारी खेळाडूंनीही तिचा फोटो, त्याच्या पाकिटात पाहिला होता. इतकंच नव्हे तर एका मुलाखतीत खुद्द शोएबनेच त्याला सोनाली बेंद्रे खूप आवडते, अशी कबुली दिली होती. भारत-पाकिस्तानच्या एका सीरिजदरम्यानही त्यांची भेट झाली होती. पण शोएबचे हे प्रेम एकतर्फी होते, कारण सोनालीकडून असं नाही नव्हतं.

शोएब अख्तरने एकदा सोनाली बेंद्रेला प्रपोज करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि गमतीने म्हणाला होता की जर अभिनेत्रीने त्याला नकार दिला तर तो तिचे अपहरण करेल. शोएबच्या या एकतर्फी प्रेमाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान, आता दोघेही विवाहित आहेत. सोनाली बेंद्रेने २००२ मध्ये दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केले तर शोएबने २०१४ मध्ये रुबाब नावाच्या पाकिस्तानी मुलीशी लग्न केले होते.

सोनाली सध्या ‘इंडिया बेस्ट डांसर ३’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. सोनाली बेंद्रेने ‘दिलजले’, ‘सरफरोश’, ‘मेजर साब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. तिचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत.