शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४९ कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता जावेद शेख यांनी शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल.
हेही वाचा- काश्मीरला जाण्यासाठी नीना गुप्तांनी केलेलं लग्न; खुलासा करत म्हणाल्या होत्या…
पाकिस्तानी अभिनेता जावेद शेख यांनी शाहरुखच्या वडिलांच्या भूमिकेसाठी फक्त एक रुपया फी मागितली होती. जावेद यांनी नुकताच एका मुलाखतीत याबाबतचा किस्सा शेअर केला आहे. जावेद म्हणाले, “शाहरुख खानचे मॅनेजर माझ्याकडे चित्रपटाचा करार घेऊन आले होते. त्यांनी मला माझ्या फीबाबत विचारलं. जावेद शेख यांनी या चित्रपटासाठी फी घेणार नसल्याचे सांगितले. जावेद म्हणाले. या चित्रपटात शाहरुख खानच्या वडिलांच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांची त्यात काम करण्यासाठी निवड होऊ शकली असती पण शाहरुख आणि फराहने माझी निवड केली, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच मी या चित्रपटासाठी फी घेण्यास स्पष्ट नकार दिला.
पुढे जावेद म्हणाले की मॅनेजरशी बराच वेळ बोलल्यानंतर या चित्रपटासाठी एक रुपया घेणार असल्याचे मी सांगितले. यानंतर चित्रपटाच्या टीमने जावेद यांची फी स्वतः ठरवली आणि त्यांना चेक देण्यात आला होता.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actor javed sheikh asked one rupee as fee for shah rukh khan film om shanti om dpj