Pakistani Actress Controversial Statement on Devdas : देवदास हा बॉलीवूडमधीस भव्य चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’कडे आजही अजरामर कलाकृती म्हणून पाहिले जाते. मात्र या आयकॉनिक चित्रपटावर पाकिस्तानी अभिनेत्रीने सडकून टीका केली आहे. हा एक ओव्हर रेटेड आणि बकवास चित्रपट असल्याचे पाकिस्तानी अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर दानानीर मोबीनने म्हटले आहे.
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या देवदास चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. भव्य सेट, कसदार अभिनय आणि प्रभावी संवाद यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. चित्रपटाची गाणी आणि जबरदस्त कथानक यामुळे देवदास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र, या चित्रपटाचे कथानक नेमके काय आहे? याद्वारे फक्त व्यसनी प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे सांगत पाकिस्तानी अभिनेत्री दानानीर मोबीनने ‘देवदास’वर टीका केली.
ही अशी अभिजात कलाकृती असते का?
पाकिस्तानी अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर दानानीर मोबीनने मॅशन (Mashion) या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये कोणता क्लासिक चित्रपट सर्वात ओव्हररेटेड वाटतो असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर कोणताही विलंब न करता तिने थेट देवदास चित्रपटाचे नाव घेतले. दानानीर मोबीन म्हणाली, मला सांगा याचं कथानक नेमकं काय आहे? यामध्ये फक्त व्यसन आणि मद्यपान दाखवण्यात आलं आहे. एक आत्मसन्मान गमावलेली स्त्री आहे, एक वडील आहेत आणि एक जबरदस्तीने लग्न लावण्यात आलेली स्त्री…हे काय आहे? आणि आणि एका स्त्रीवर लादलेला पुरुष… हे काय चालले आहे आणि ही अशी अभिजात कलाकृती असते का? असे म्हणत दानानीर मोबीनने देवदास चित्रपटावर जोरदार टीका केली.
पुढे ती म्हणाली की, चित्रपटाचा भव्यदिव्य सेट, सुंदर आऊटफिट, ज्वेलरी हे समजू शकते. पण चित्रपटाला गोष्ट कुठे आहे? आपण व्यसनाच्या विकृतीचं समर्थन का करतोय? असे म्हणत दानानीर मोबीनने देवदास चित्रपटाला अतिमहत्त्व दिल्याचे म्हटले आहे.
Someone should remind Dananeer, Devdas does not glorify alcoholism. His downfall is driven by ego and addiction, and he dies broken. Paro’s choice to marry another man is an act of self-respect, not weakness. The only thing overrated here is her fake accent, not Devdas pic.twitter.com/rRVKc6OKiw
— r (@bekhayalime) May 15, 2026
I'm sure Dananeer has no clue that Devdas was based on a novel from Sarat Chandra Chattopadhyay, one of the most prolific authors from the Bengali Renaissance. This is what happens when you become an actor due to viral reels. She probably thinks Ismat Chughtai is a medical lab pic.twitter.com/CATep4nU71
— Syed Zain Raza (@MrZainRaza) May 15, 2026
पाकिस्तानी अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल
देवदास चित्रपटाबद्दलची पाकिस्तानी अभिनेत्रीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भारतीय प्रेक्षकांनी दानानीर मोबीनला ट्रोल केले असून तिचे वक्तव्य बालिश आणि अज्ञानातून आल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मला खात्री आहे की, दानानीरला देवदास चित्रपट लोकप्रिय बंगाली लेखक शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित असल्याचे अजिबात माहिती नसणार. व्हायरल रिलमुळे अभिनेत्री झालं की हे असं होतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हिचे ‘देवदास’बद्दलचे मत किती उथळ आणि अपुऱ्या माहितीवर दिले गेले आहे. प्रत्येकाच्या मताला इतके महत्त्व देण्याची काही गरज नाही,” असे लिहित नेटकऱ्यांनी पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर दानानीर मोबीनवर पलटवार केला आहे.
