आतापर्यंत अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये अभिनेते व अभिनेत्रींचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण एका पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय व्यक्तीशी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं.

पाकिस्तानमध्ये आघाडीच्या कलाकारांबरोबर या अभिनेत्रीने काम केलं आहे. तिच्या अनेक मालिका प्रचंड गाजलेल्या आहेत. तिने भारतीय तरुणाशी प्रेमविवाह केला आहे. तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत.

भारताची सून असलेल्या या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव मदिहा इमाम आहे. मदिहाने २०२३ मध्ये चित्रपट निर्माता मोजी बसर याच्याशी लग्न केलं. मोजी बसर अरुणाचल प्रदेशचा आहे. तो ‘द सिक’ चित्रपटासाठी ओळखला जातो. तो कार्तिक आर्यन आणि कृती सॅनन यांच्या ‘लुका छुपी’ या चित्रपटाचा प्रोडक्शन मॅनेजर होता.

कोण आहे मदिहा इमाम?

३४ वर्षांची पाकिस्तानी अभिनेत्री मदिहा इमामने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती अभिनेत्री मनीषा कोइराला आणि रोहित सराफ यांच्या २०१७ मध्ये आलेल्या ‘डियर माया’ चित्रपटात दिसली होती. ‘दिल-ए-मोमीन’, ‘मुझे कबुल नहीं’, ‘बेहद’, ‘इश्क जलेबी’ यांसारख्या अनेक पाकिस्तानी ड्रामामध्ये मदिहाने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलंय.

मदिहा व मोजीची प्रेम कहाणी

मदिहा इमाम आणि मोजी बसर यांची प्रेमकहाणी काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मदिहाने फुशिया मॅगझिनच्या पॉडकास्टमध्ये याबद्दल सांगितलं होतं. मदिहा एका बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आली होती आणि तेव्हाच तिची मोजीशी भेट झाली. त्यावेळी मोजी त्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये इंटर्नशिप करत होता. पाकिस्तानी अभिनेत्री मोजीबद्दल म्हणाली, “मला तो खूप प्रेमळ आणि मेहनती वाटला आणि मला असे लोक आवडतात जे कठोर परिश्रम करतात आणि चांगले दिसतात. मी सिंगल होते आणि मला तो खूप आवडला होता.”

View this post on Instagram

A post shared by Madiha Imam-Basar (@madihaimam)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नामुळे झालेलं ट्रोल

काही वर्षे डेट केल्यावर मदिहा इमाम व मोजी बसर यांनी १ मे २०२३ रोजी दुबईत लग्न केलं होतं. मदिहा मोजीपेक्षा काही वर्षांनी मोठी आहे. या दोघांनी लग्न केलं तेव्हा दोघेही वेगवेगळ्या देशातले असल्याने त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.