scorecardresearch

भगव्या बिकिनीनंतर ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ गाणं पुन्हा वादात; Video शेअर करत पाकिस्तानी गायकाचा आरोप

‘बेशरम रंग’मागचे ग्रहण संपेचना, भगव्या बिकिनीमुळे वादात अडकलेल्या गाण्यावर चोरीचा आरोप

भगव्या बिकिनीनंतर ‘पठाण’चं ‘बेशरम रंग’ गाणं पुन्हा वादात; Video शेअर करत पाकिस्तानी गायकाचा आरोप
(फोटो – स्क्रीनशॉट्स)

अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. तब्बल चार वर्षांनी ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख पुनरागम करतोय. अशातच त्याच्या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. पण यातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आणि भगव्या बिकिनीमुळे वादात सापडलं. दरम्यान, या गाण्यामागचं ग्रहण संपायची नावं घेत नाहीये. सेन्सॉर बोर्डाने गाण्यात बदल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता गाण्याचं संगीत चोरल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘या’ तीन कारणांमुळे शाहरुखचा ‘पठाण’ फ्लॉप होणार; प्रसिद्ध अभिनेत्याचा दावा, म्हणाला, “चित्रपटाचं…”

सज्जाद अलीच्या मते ‘बेशरम रंग’ हे त्याच्या ‘अब के हम बिछडे’ या अनेक वर्षे जुन्या गाण्यासारखं आहे. त्याने ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे, चित्रपटाचे किंवा गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आपण एका आगामी चित्रपटातील गाणं ऐकत असताना आपल्या जुन्या गाण्याची आठवण आल्याचं सांगितलं. तसेच त्याने ते गाणं व्हिडीओत गायलं देखील आहे.

सज्जाद ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्याबद्दल बोलत असल्याचा अंदाज त्याचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स लावत आहेत. सज्जाद अलीच्या व्हिडीओवर युजर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे पठाणच्या बेशरम रंग गाण्यासारखं वाटतं.’ दुसर्‍याने लिहिले, ‘बेशरम रंग सज्जाद अलीच्या संगीत रचनेवर आधारित आहे. भारतातील लोक नेहमीच पाकिस्तानी गायकांचे संगीत चोरतात आणि त्यांना श्रेयही देत ​​नाहीत. त्याच वेळी, काही युजर्सच्या मते दोन्ही गाणी वेगळी आहेत. तर, काहींच्या मते दोन्ही गाण्यांची चाल सारखीच आहे. आज तकने याबद्दल वृत्त दिलंय.

“कोणती नशा करतोस?” मोदींच्या आईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केल्याने शाहरुख खान ट्रोल, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी इंडस्ट्रीमधून गाणी किंवा ट्यून चोरल्याचा आरोप बॉलिवूडवर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी कलाकारांनी यापूर्वीही अनेकदा असे आरोप केले आहेत. गायक आणि राजकारणी अबरार-उल-हक यांनी करण जोहरच्या ‘जुगजुग जिओ’ या चित्रपटातील त्यांचं आयकॉनिक गाणं ‘नच पंजाबन’ चोरल्याचा आरोप केला होता. तसेच याबद्दल तो टी-सीरिजवर खटला दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 07:53 IST

संबंधित बातम्या