आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी पलक मुच्छाल ही सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. पलक गरजू मुलांच्या उपचाराचा खर्च उचलते. आतापर्यंत तिच्या मदतीने जवळपास ३ हजार मुलांच्या हार्ट सर्जरी करण्यात आल्या. ज्या मुलांना हृदयाशी संबंधित विकार असतात व त्यांचा खर्च कुटुंबीय उचलू शकत नसतील, अशा मुलांची मदत पलक करते. आज पलक इंडियन एक्सप्रेसच्या द सुवीर सरन शोमध्ये तिचं करिअर व समाजकार्याची आवड याबद्दल बोलणार आहे.
गरजू मुलांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारी गायिका पलक मुच्छालची LIVE मुलाखत
पलक मुच्छालने अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी लोकप्रिय गाणी गायली आहेत. पाहा तिची लाइव्ह मुलाखत...
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 08-03-2025 at 20:14 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palak muchhal live interview the suvir saran show indian express hrc