Paresh Rawal on Hera Pheri 3: काही चित्रपट वर्षानुवर्षे पाहिले जातात, लक्षात ठेवले जातात. काही चित्रपटांचे पुढचे भाग पाहायला मिळतात. हेरा फेरी हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे.

हेरा फेरी आणि हेरा फेरी २ हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटातील अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांना वेड लावले. चित्रपटांतील डायलॉग्ज लोकप्रिय ठरले.

काही दिवसांपूर्वी हेरा फेरी ३ येणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे ‘हेरा फेरी ३’ची घोषणा केल्यानंतर परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर सहकलाकार आणि निर्माता अक्षय कुमारने परेश रावल यांच्या विरोधात २५ कोटींचा दावा दाखल केला होता. काही काळानंतर परेश रावल यांनी चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हेरा फेरी ३ची घोषणा केल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

“अक्षय कुमार आणि निर्माते यांच्यातील…”

आता परेश रावल यांनी एका मुलाखतीत अक्षय कुमार, हेरा फेरी ३ चित्रपट याबद्दल वक्तव्य केले आहे. ‘द लवेरी शो’मध्ये ते म्हणाले, “चित्रपट लवकरच येणार आहे. जो काही विलंब होत आहे, तो अक्षय कुमार आणि निर्माते यांच्यातील तांत्रिक अडचणींमुळे चित्रपटाच्या शूटिंगला विलंब होत आहे. मधल्या काळात अक्षय कुमारने माझ्यावर २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला,अशी जी चर्चा झाली, ते सगळं ठीक आहे.”

पुढे ते असेही म्हणाले की, या वादाशी माझा वैयक्तिकरित्या काहीही संबंध नाही. जेव्हा निर्माते व अक्षय कुमार यांच्यातील तांत्रिक समस्या सुटल्या की मी चित्रपटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास तयार आहे.

हेरा फेरीमधील बाबुराव या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “जर हेरा फेरीमध्ये बाबुराव हे पात्र नसेल तर चित्रपटातील गंमत राहणार नाही. तो चित्रपट आता जसा दिसतो तसा दिसणार नाही. त्यामुळेच निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यातील प्रश्न सुटले की मी चित्रपटांच्या कागदांवर सही करेन.”

२०२२ मध्ये हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर परेश रावल यांनी अचानक या चित्रपटातून माघार घेतल्याचे समोर आले होते. यानंतर हे वाहणे प्रोफेशनल नसल्याचे म्हणत अक्षय कुमारने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली होती.

काही काळानंतर दोघांमधील मतभेद मिटले आणि शेवटी अक्षय कुमारने कारवाई मागे घेतली. दरम्यान, आता हा चित्रपट कधी भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.