‘आप’च्या खासदारांनी नात्याबद्दल शिक्कामोर्तब केल्यावर पुन्हा एकत्र दिसले राघव चड्ढा-परिणीती चोप्रा, फोटो व्हायरल

पुन्हा एकदा परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा दिल्ली एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत.

parineeti chopra raghav chadha
(परिणीती चोप्रा व राघव चोप्रा)

परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच आपचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय. अशातच आता पुन्हा एकदा परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा दिल्ली एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत.

“तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

लग्नाच्या अफवांदरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी पत्रकारांना टाळून परिणीती घाईघाईने कारमध्ये शिरताना दिसली. तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. राघव चड्ढाही तिच्याबरोबर होते, नंतर तेही घाईघाईने कारमध्ये बसून निघून गेले.

परिणीती चोप्रा व राघव चड्ढा

राघव व परिणीती या दोघांच्या कुटुंबियांची लग्नाबद्दल बोलणी सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. परिणीती बुधवारी एअरपोर्टवर दिसली होती, तेव्हा राघव चड्ढाबद्दल प्रश्न विचारल्यावर ती लाजताना दिसली.

यापूर्वी राघव यांना प्रश्न विचारला असता ‘मला राजकारणाबद्दल विचारा, परिणीतीबद्दल नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:51 IST
Next Story
राघव चड्ढा यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओला परिणीती चोप्राने केलं लाइक; नेटकरी म्हणाले “लग्नाची तारीख…”
Exit mobile version