scorecardresearch

Premium

Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत

Raghav Chadha Parineeti Chopra Marriage: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update
राघव चड्ढा परिणिती चोप्रा लग्न

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. २४ सप्टेंबरला दोघं लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा (Raghav Parineeti Wedding) आपल्या कुटुंबियांबरोबर उदयपूरला पोहोचले आहेत. यासंबंधितचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “देवाने सांगितलं नाहीये की…”, गणेशोत्सवातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

Parth Bhalerao And Gaurav More
एका शब्दामुळे गौरव मोरेला अडवलं होतं विमानतळावर; पार्थ भालेरावने सांगितला ‘तो’ किस्सा
Parineeti Chopra shared a special wedding video
Video : आकर्षक सजावट, पाहुण्यांची मांदियाळी, वरात, वरमाळा अन्..; परिणीती चोप्राने शेअर केला लग्नाचा खास व्हिडीओ
parineeti chopra mangalsutra
परिणीती चोप्राचं मंगळसूत्र पाहिलंत का? बहीण प्रियांकाशी आहे खास कनेक्शन
Parineeti Chopra Raghav Chadha first photo as husband and wife out
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक

आज सकाळी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आपल्या कुटुंबाबरोबर उदयपूर विमानतळावर दिसले. यावेळी दोघांच्या कुटुंबियांचं आणि पाहुणेमंडळींचं जंगी स्वागत करण्यात आलं.

हेही वाचा – ‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अ‍ॅटलीवर आहे नाराज

उदयपूर विमानतळावर परिणीती लाल रंगाच्या रॉम्परमध्ये दिसली. तर राघव चड्ढा काळ्या रंगाच्या फूल स्लीव्स टीर्शट आणि ब्लू डेनिम पॅन्टमध्ये पाहायला मिळाले. दोघांच्या चेहऱ्यांवर लग्नाचा आनंद दिसत होता. यावेळी परिणीतीबरोबर तिचे आई-वडील, भाऊ देखील होता.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमचा विश्वास…”

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

दरम्यान, १३ मे २०२३ला परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दोघांच्या लग्नाच्या तारेखबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर तो क्षण आला आहे. उद्या परिणीती आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti chopra and raghav chadha reaches with family to wedding venue pps

First published on: 22-09-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×