बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आता मिसेज चड्ढा झाली आहे. २४ सप्टेंबरला परिणीती चोप्राने आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली. या खास क्षणाचे फोटो परिणीती आणि राघव यांनी २५ सप्टेंबरला सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे सध्या परिणीतीच्या लग्नातील लूक पासून ते तिच्या मंगळसूत्रापर्यंतची चर्चा सुरू आहे. बरेच लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता लग्नातील परिणीती आणि राघव चड्ढा यांचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
लग्नातील हा कपल डान्स व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये परिणीती आणि राघव डान्स करताना पाहायला मिळत आहे. दोघं छत्री घेऊन डान्स करताना दिसत आहेत.
उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पंजाबी पद्धतीत परिणीती आणि राघव यांचं लग्न झालं. त्यानंतर परिणीती काल २५ सप्टेंबरला राघव यांच्याबरोबर दिल्लीत म्हणजे सासरी पोहोचली. दिल्ली विमानतळावरील या नवविवाहित जोडप्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यावेळी परिणीती नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक लूक दिसली.
दरम्यान, लवकरच हे जोडपं जवळच्या मित्रमंडळींना दिल्ली आणि मुंबई
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra and raghav chadha wedding umbrella dance video viral on social media pps