बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा नुकतेच विवाह बंधनात अडकले. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न झाला. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चांगलीच ट्रोल झाली. २३ सप्टेंबरला राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम झाले. तर २४ सप्टेंबरला ही दोघं लग्न बंधनात अडकली. या संपूर्ण लग्नामध्ये त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळाला. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा हे कपल उदयपूरहून पुन्हा घरी जाण्यासाठी निघालं तेव्हाचा यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. तर त्या व्हिडीओमधील परिणीतीच्या लुकमुळे नेटकरी नाराज झाले आहेत. आणखी वाचा : राघव-परिणीतीच्या लग्नाचा शाही थाट! विवाहस्थळ असलेलं ‘द लीला पॅलेस’ पाहिलंत का? भाडं तब्बल… व्हिडीओत राघव चड्ढा पांढरा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहेत. तर, परिणीतीने निळ्या जीन्सवर गुलाबी रंगाचे कफ्तान घातले आहे. हे दोघेजण बोटीतून किनाऱ्यावर चालत येताना दिसत आहेत. पण लग्नानंतर पहिल्याच दिवशी परिणीतीने जीन्स घातल्याचं अनेकांना खटकलं. हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल… या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. एकाने लिहिलं, "ही अजिबातच नवविवाहित वाटत नाही." तर दुसरा नेटकरी म्हणाला, "लग्नानंतर लगेचच तिने जीन्स का घातली? ड्रेस तरी घालायला हवा होता." तर आणखी तिसऱ्याने लिहिलं, "परिणीती, काही दिवस साडी नेस." तर आणखी एक जण म्हणाला, "याच्यापेक्षा कुलाबा कॉजवेवरून घेतलेले कपडे चांगले असतात.", "ही तर हद्द झाली, चुड्याचा रंगही स्वतःला हवा तसा बदलून घेतला," असंही एकाने लिहिलं.