scorecardresearch

Premium

Video: एकमेकांना हार घातल्यावर परिणीती चोप्राने राघवला केलं किस, नवविवाहित दाम्पत्याचा लग्नातील व्हिडीओ व्हायरल

२४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न झाला.

parineeti raghavv

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा नुकतेच विवाह बंधनात अडकले. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न झाला. तर आता त्यांच्या लग्नसोहळ्यातले काही फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. २३ सप्टेंबरला राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम झाले. तर २४ सप्टेंबरला ही दोघं लग्न बंधनात अडकली. या संपूर्ण लग्नामध्ये त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळाला. तर आता त्यांच्या वरमाला विधीनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

kranti redkar and sameer wankhede twins daughters
Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
pariniti
परिणीती-राघव यांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा राहणार गैरहजर? अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
parineeti raghav wedding plan
राघव-परिणीतीच्या लग्नात पाहुण्यांसाठी कडक नियमावली, पाळाव्या लागणार ‘या’ अटी

आणखी वाचा : “ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातल्यानंतर फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आता पुढे काय करायचं असतं? असा प्रश्न परिणीती विचारताना दिसत आहे. तर इतक्यात परिणीतीच्या एका मैत्रिणीने समोरून तिला काहीतरी सांगितलं जे ऐकून परिणीती काहीशी लाजली आणि हसत तिला गप्प केलं. तर नंतर राघवबरोबर फोटोसाठी पोज देताना परिणीती हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याला गालावर किस केलं.

हेही वाचा : Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”

तर आता त्या दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यावर कमेंट करत नेटकरी आणि त्यांचे चाहते त्यांचा हा रोमँटिक अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti chopra kissed raghav chadha after varmala vidhi video gets viral rnv

First published on: 26-09-2023 at 19:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×