बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १३ मेला या परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता दोघंही लग्नाच्या तयारीला लागले आहेत. परिणीती व राघव लग्न कुठे करणार? याबाबत चर्चा रंगत आहेत.
साखरपुड्यानंतर लग्न कुठे करायचं? याचं प्लॅनिंग परिणीती व राघव करत होते. आता त्यांनी लग्न नेमकं कुठे करायचं हे ठरवलं आहे. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, काही मीडिया रिपोर्ट्सने नमुद केल्याप्रमाणे, उदयपुरमधील ओबेरॉल उदयविलास रिसॉर्टमध्ये दोघंही लग्न करण्याचं प्लॅनिंग करत आहेत. पिछोला लेकच्या किनारी हे पंचतारांकित हॉटेल आहे. सध्या परिणीती व राघव लग्नाची तयारी करण्यात व्यग्र आहेत.




आणखी वाचा – भाड्याच्या घरात राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, घरभाडं किती? हेही सांगितलं अन्…
या वर्षाच्या अखेरीस दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. हे रिसॉर्ट अगदी महागडं आहे. तसेच परिणीती व राघवने इतर सेलिब्रिटींप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिलं आहे. परिणीती व राघवचा साखरपुडा अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडला होता. पण लग्नाला किती लोक उपस्थित असणार? नक्की उदयपुरमध्येच लग्न होणार का? याबाबत परिणीती व राघव यांनी बोलणं टाळलं आहे.
साखरपुड्यापूर्वी बरेच महिने परिणीती व राघवच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर विमानतळावर दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहिर कबुली दिली.