बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या दोघांचा साखरपुडा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या दोघांच्या साखरपुड्यासाठी नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी दिल्लीतील अनेक ‘आप’ नेतेही उपस्थित होते.
आणखी वाचा : Video : परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या साखरपुड्यातील Inside व्हिडीओ समोर, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Thackeray Group Criticizes shinde group as devendra fadnvis announced shrikant shinde Candidature for Kalyan Lok Sabha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाची शिंदेवर टीका
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी एक ट्वीट करत परिणीती आणि राघव यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत राघव चड्ढा हे अरविंद केजरीवालांची गळाभेट घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते परिणीती आणि राघव यांनी पुष्पगुच्छ भेट म्हणून देताना पाहायला मिळत आहे.

“आयुष्याच्या या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. देव तुम्हा दोघांना कायमच आनंदी ठेवो. देवाने बनवलेली ही तुमची सुंदर जोडी अशीच कायम राहो”, असे ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

दरम्यान परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या खास फोटोंची सोशल मीडियात चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.