scorecardresearch

Premium

Video: लग्नानंतर पहिल्यांदाच राघव चड्ढा व परिणीती चोप्रा आले माध्यमांसमोर, व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : राघव आणि परिणीतीचा लग्नानंतरचा पहिला व्हिडीओ समोर

parineeti chopra raghav chadha first appearance after wedding
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

राघव चड्ढा व परिणीती चोप्रा यांनी रविवारी (२४ सप्टेंबर रोजी) उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनी सोमवारी सकाळी लग्नाचे फोटो शेअर केले. त्यानंतर आता पहिल्यांदाच दोघेही माध्यमांसमोर आले आहेत. परिणीती व राघव लग्नानंतर उदयपूरहून जाण्यासाठी निघाले, तेव्हाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

deepa chaudhari gave special gift to dhanashri kadgaonkar son kabir
Video : ‘तू चाल पुढं’मध्ये वैरी तर ऑफस्क्रीन ‘असा’ आहे बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा अन् दीपा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत
Vaibhav Tattvadi celebrated his birthday
Video औक्षण, केक, मिठाई अन्..; वैभव तत्तवादीने खास मित्रांबरोबर साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
Parineeti Chopra Raghav Chadha first photo as husband and wife out
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक
rahul vaidya
Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

‘वूम्पला’ने शेअर केलेल्या व्हिडीओत राघव चड्ढा पांढरे शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहेत. तर, परिणीतीने निळ्या जीन्सवर गुलाबी रंगाचे कफ्तान घातले आहे. परिणीती आणि राघव दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आले, तेव्हाचा हा त्यांचा व्हिडीओ आहे.

दरम्यान, आप नेते राघव व बॉलीवूड अभिनेत्री परिणीती या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. दोघांनी मे महिन्यात दिल्लीत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

राघव व परिणीतीच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तसेच मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा हे देखील उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti chopra raghav chadha first public appearance after wedding hrc

First published on: 25-09-2023 at 14:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×