बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १३ मे ला परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
हेही वाचा- ‘मिर्झापूर’ फेम अभिनेता होणार बाबा, वर्षभरापूर्वी झालेलं लग्न




मिळालेल्या माहितीनुसार परिणीती आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहेत. राघव आणि परिणीती यांचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार आहे. २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील. दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. लग्नाअगोदर परिणीतीचे मुंबईतील आणि राघव यांचे दिल्लीतील घराची सजावट करण्यात आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
२३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता परिणीतीच्या बांगड्या (चूडा) कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता परिणीती आणि राघव यांचा संगीताचा कार्यक्रम आहे. २४ सप्टेंबरला म्हणजे लग्नाच्या दिवशी दुपारी १ वाजता राघव यांची सेहराबंदी असेल. दुपारी २ वाजता राघव यांची घोड्यावरुन वरात काढण्यात येणार आहे. ३.३० वाजता जयमाला आणि ४ वाजता सप्तपदी. संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येईल. आणि रात्री ८.३० वाजता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.