scorecardresearch

Premium

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

Raghav Chadha Parineeti Chopra Marriage: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातील ‘हा’ व्हिडीओ पाहा

Parineeti Chopra-Raghav Chadha
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातील 'हा' व्हिडीओ पाहा

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये आज या शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. संगीत सोहळ्यातील एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे. (Raghav Parineeti Wedding)

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
kranti redkar and sameer wankhede twins daughters
Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
priyanka Chopra comment on Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos
परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नाला गैरहजेरी, बहिणीच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत प्रियांका चोप्रा म्हणाली…
Dnyanada supriya
‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

परिणीती-राघव यांच्या संगीत सोहळ्यातील इनसाइड व्हिडीओ परिणीतीच्या इन्स्टाग्राम फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, लोकप्रिय पंजाबी गायक नवराज हंस गाताना दिसत आहे. ‘दिल चोरी साडा हो गया’ आणि ‘गुड नाला इश्क मिठा’ अशी गाणी गाताना नवराज पाहायला मिळत आहे. यावेळी पाहुणे मंडळी एन्जॉय करताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

हेही वाचा – Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर

परिणीती-राघव यांच्या लग्नासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोघं आपल्या पत्नीसह काल उदयपूरमध्ये दाखल झाले. यावेळी राघव चड्ढा यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं.

दरम्यान, कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. जेव्हा दोघांना इंग्लंडमध्ये इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रेम कहाणी २०२२पासून सुरू झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या पंजाब चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पुन्हा दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti chopra raghav chadha sangeet inside video viral guests dancing to navraj hans live music pps

First published on: 24-09-2023 at 14:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×