बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ स्पप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्नाचे आयोजन करण्यात आलं आहे. आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हेही वाचा- “ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…” दरम्यान परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच परिणीती लग्नात नेमके कोणते कपडे घालणार आहे याबाबतची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घालणार आहे. परिणीती आणि मनीष यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. लग्नाच्या काही दिवस अगोदर परिणीती मनीषच्या घरातही दिसली होती. त्यावेळेस परिणीती तिच्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे घालणार अशी चर्चा रंगली होती. https://www.instagram.com/p/CxZ1qHpM9Gv/?utm_source=ig_embed&ig_rid=35780bf6-ff73-46df-ac60-5c43426e054b लग्नासाठी परिणीती १७ सप्टेंबरला मुंबईहून दिल्लीत पोहोचली होती. त्यानंतर १९ सप्टेंबरला परिणीतीच्या हातावर राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी काढली. लग्नापूर्वीच्या पहिल्या विधीचा फोटो आला समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांचं घर सजलं आहे. पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली आहे. पंडारा रोड स्थित असलेलं राघव यांच्या घराजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. हेही वाचा- पत्नी घरी नसताना झाला अखिल मिश्रांचा अपघात, सुझानला धक्क्यातून सावरता येईना; प्रतिक्रिया देत म्हणाली… या शाही लग्नसोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापासून ते राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांच्यापर्यंत सर्वांना आमंत्रित केलं आहे. तसेच परिणीतीकडून अनेक बॉलीवूडचे सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.