बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या २४ सप्टेंबरला दोघंही विवाहबंधनात अडकणार आहे. राजस्थानच्या उदयपुरमध्ये परिणीती आणि राघव यांच्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाही विवाहाचे आयोजन करण्यात आलं आहे. सध्या दोघांच कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. परिणीतीच्या सासरी कोण कोण आहे. आणि तिचे सासू सासरे नेमकं काय करतात तुम्हाला माहिती आहे का? घ्या जाणून

हेही वाचा- विराट-अनुष्काच्या घरी गणेशोत्सवाची तयारी, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

राघव चड्ढा यांच्या कुटुंबाबत बोलायचं झालं तर ते पंजाबी आहेत. त्यांचे वडील सुनील चड्ढा हे व्यापारी आहेत, तर आई अलका गृहिणी आहेत. राघव यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे. राघव आभ्यास खूप हुशार होते. राघव चढ्ढा यांनी दिल्ली विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून EMBA कोर्स केला आहे. यासोबतच त्यांनी अनेक अकाउंटन्सी फर्ममध्येही काम केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी राघव हे चार्टर्ड अकाउंटंट होते.

परिणीतीच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर ती देखील पंजाबी कुटुंबातून येते. तिचे वडील पवन चोप्रा अंबाला कॅन्टमध्ये पुरवठा व्यवसाय करतात. परिणीतीची आई रीना मल्होत्रा ​​गृहिणी आहे. त्या सिंगापूरच्या रहिवासी आहे.

हेही वाचा-

असे असतील लग्नाचे विधी

परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होतील. २३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता परिणीतीच्या बांगड्या (चूडा) कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता परिणीती आणि राघव यांचा संगीताचा कार्यक्रम आहे. २४ सप्टेंबरला म्हणजे लग्नाच्या दिवशी दुपारी १ वाजता राघव यांची सेहराबंदी असेल. दुपारी २ वाजता राघव यांची घोड्यावरुन वरात काढण्यात येणार आहे. ३.३० वाजता जयमाला आणि ४ वाजता सप्तपदी. संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची पाठवणी करण्यात येईल. आणि रात्री ८.३० वाजता रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra raghav chadha wedding know about actress in laws and family dpj
First published on: 18-09-2023 at 17:16 IST