Parineeti Chopra on Raghav Chadha News: आम आदमी पार्टीने (AAP) एक मोठा निर्णय घेत राघव चड्ढा यांची राज्यसभेतील पक्षाच्या उपनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता खासदार अशोक मित्तल यांची वर्णी लागली आहे. यानंतर आप आणि राघव चड्ढा यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्री परिणीती चोप्रा एका शूटिंगसाठी आली असता तिला पतीबद्दल विचारण्यात आलं. पण परिणीतीने राघव चड्ढा यांच्या राजकीय स्थितीवर मौन बाळगलं.

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या नवीन चॅट शोमुळे चर्चेत आहे. त्या चॅट शोच्या शूटिंगचा परिणीतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिला पती राघव चड्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम आदमी पार्टी’ने राघव चड्ढा यांची राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवलं आहे. तेव्हापासून आम आदमी पार्टी आणि राघव चड्ढा यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.

परिणीती नुकतीच तिच्या आगामी शोच्या निमित्ताने शूटिंगसाठी आली होती. तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. यावेळी तिने फोटोग्राफर्सना पोझ दिल्या. याच कार्यक्रमातील परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हात जोडून उभी आहे. तिला पती राघव चड्ढा यांच्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा परिणीती म्हणाली, “मला माहीत नाही. मला कोणी काहीच सांगत नाही.”

Award Banner

पाहा परिणीती चोप्राचा व्हिडीओ

प्रियांका चोप्राची राघव चड्ढांच्या समर्थनार्थ कमेंट

दोन दिवसांपूर्वी राघव चड्ढा यांनी त्यांच्या राज्यसभेतील भाषणांच्या मुद्द्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर त्यांची मेहुणी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘हार्ट आईज’ आणि टाळ्या वाजवणारे इमोजी वापरून कमेंट केली.

दरम्यान, परिणीती चोप्राचा ‘मॉम टॉक्स’ नावाचा नवीन चॅट शो नुकताच सुरू झाला आहे. हा शो ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये परिणीती मातृत्वाबद्दल संवाद साधताना दिसणार आहे. शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून, राघव चड्ढा यांनी पत्नी परिणीतीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि परिणीतीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं.

परिणीती आणि राघव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, सप्टेंबर २०२३ मध्ये उदयपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. दोघेही ऑक्टोबर २०२५ मध्ये आई बाबा झाले. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांनी मुलाचं नाव ‘नीर’ असं ठेवलं आहे.