बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने २४ सप्टेंबरला आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढासोबत लग्नगाठ बांधली. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्नाचे विधी पार पडले. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक नेते उपस्थिती लावली होती. परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता परिणीतीने पती राघव यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. सगळीकडे या गिफ्टची चर्चा सुरु आहे. पण ते गिफ्ट नेमकं काय आहे? घ्या जाणून
हेही वाचा- परिणीती चोप्राने लग्नाच्या दिवशी ‘अशी’ जपली आजीची खास आठवण, मनीष मल्होत्राने शेअर केला Unseen फोटो…




अभिनेत्रीबरोबर परिणीती एक उत्तम गायिकाही आहे. परिणीती अनेकदा गाण गातानाचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. परिणीतीने राघव यांच्यासाठी एक गाण रेकॉर्ड केलं आहे. ‘ओ पिया, ओ पिया, चल चलें. बाट लें गम-खुशी साथ में’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाण खुद्द परिणीतीने गायलं आहे. हे गाणे गौरव दत्ता यांनी संगीतबद्ध केले असून गौरव, सनी एमआर आणि हरजोत कौर यांनी ते लिहिले आहे.
हेही वाचा- लग्नानंतर परिणीती- राघव ‘या’ दिवशी देणार रिसेप्शन; ठिकाण आणि तारीख समोर
लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली होती. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ४ ऑक्टोबरला मुंबईत परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.
थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती आणि राघव दिल्लीत दाखल झाले. सासरी परिणीतीचं जोरदार स्वागत करण्यात आले. याचे काही व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेली बरेच महिने परिणीती व राघवच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी दोघांना एकत्रित पाहिलं गेलं. मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अखेर मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.