Premium

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबात रंगणार क्रिकेटचा सामना, जाणून घ्या लग्नाचा पूर्ण प्लॅन?

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्न सोहळ्याला कधीपासून होणार सुरुवात?

parineeti raghav wedding plan

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. २४ सप्टेंबरला राजस्थान येथील उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं बोललं आहे. राजेशाही पद्धतीत हा लग्न सोहळा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. पण या लग्नापूर्वी चोप्रा आणि चड्ढा या दोन्ही कुटुंबामध्ये क्रिकेट सामना रंगणार असल्याचं आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

परिणीती आणि राघव चड्ढा यांचं लग्न शीख पद्धतीत होणार आहेत. तसेच लग्नातील इतर कार्यक्रम देखील शीख परंपरेनुसार होणार आहेत. अरदास आणि कीर्तन दिल्लीत होणार आहे. त्यानंतर परिणीती आणि राघव यांनी आपल्या मित्रपरिवारासाठी गेट-टू-गेदर पार्टी आयोजित केली आहे.

हेही वाचा : Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो

पण या शाही लग्न सोहळ्यापूर्वी चोप्रा विरुद्ध चड्ढा कुटुंब असा क्रिकेट सामना दिल्लीतल्या एका मैदानात रंगणार आहे. या क्रिकेट सामन्यानंतर दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्यासाठी उदयपूरला रवाना होणार आहेत. पण या लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबात क्रिकेट व्यतिरिक्त बरेच मजेशीर खेळ होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता चोप्रा विरुद्ध चड्ढा क्रिकेट सामान्यात कोणतं कुटुंब बाजी मारणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

दरम्यान, २२ सप्टेंबरपासून या बहुचर्चित लग्नासाठी पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असून २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं जात आहे. या शाही लग्नसोहळ्याला दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापासून ते राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांच्यापर्यंत सर्वांना आमंत्रित केलं आहे. तसेच परिणीतीकडून अनेक बॉलीवूडचे सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parineeti raghav wedding before chopra vs chadha family cricket match may held and many fun activities pps

First published on: 18-09-2023 at 17:19 IST
Next Story
परिणीती चोप्राच्या सासरच्या कुटुंबात नेमकं कोण कोण? जाणून घ्या