Pathaan Box Office Collection : 'पठाण'ची लवकरच होणार ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सोमवारीही चित्रपटाची जबरदस्त कमाई | pathaan box office collection of day six soon shahrukh khans film will enter into 300 crore club | Loksatta

Pathaan Box Office Collection : ‘पठाण’ची लवकरच होणार ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सोमवारीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

बॉक्स ऑफिसच्या ‘मंडे टेस्ट’मध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे

pathaan box office day 6 collection
फोटो : सोशल मीडिया

Pathaan Box Office Collection Day 6 : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आज तब्बल ६ दिवसांनीसुद्धा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ४ वर्षांनी दमदार कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानवर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

एवढंच नाही तर बॉक्स ऑफिसच्या ‘मंडे टेस्ट’मध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. सोमवारीसुद्धा या चित्रपटाने तब्बल २५ कोटी इतकी कमाई केली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यावरून या आठवड्यातसुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : “पठाण फ्लॉप झाला असता तर…” शाहरुख खानने केला त्याच्या ‘प्लॅन बी’बद्दल खुलासा

चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर करत पठाणचे जगभरातील कमाईची आकडे मांडले आहेत. त्यांच्या या पोस्टनुसार ‘पठाण’ने जगभरात ५०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. त्यापैकी भारतातील या चित्रपटाची कमाई ही ३३५ कोटी आहे. सोमवारपर्यंत या चित्रपटाने जगभरात २९७ कोटीची कमाई केली आहे, ‘पठाण’ लवकरच ३०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या चित्रपटाची हीच घोडदौड सुरू राहिली तर उद्या म्हणजेच ७ व्या दिवशी हा चित्रपट ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेईल. शाहरुखचा हा जबरदस्त कमबॅक प्रेक्षकांनी धूमधडाक्यात साजरा केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड वाद निर्माण झाला, तरीसुद्धा अगदी कमी प्रमोशन करूनही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:38 IST
Next Story
Video : बाप तशी लेक! प्रियांका चोप्रा-निक जोनसच्या मुलीचा चेहरा अखेर दिसला, व्हिडीओ समोर