शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. जगभरात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली आहे.

२५ जानेवारी रोजी ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. शाहरुखबद्दलची त्यांची क्रेझ आणि चित्रपटाबद्दलची त्यांची उत्सुकता ते ॲडव्हान्स बुकिंगच्या प्रतिसादातून दाखवत आहेत. आता या चित्रपटाने विक्रम नोंदवायला सुरुवात केली आहे. नुकताच या चित्रपटाने एस एस राजामौली यांच्या ऑस्करच्या शर्यतीत आलेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

Kalki 2898AD
‘कल्की : २८९८ एडी’चा जगभरात जलवा! प्रभासच्या चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Ranbir kapoor
‘या’ कारणामुळे रणबीर कपूरचे चित्रपट होतात ब्लॉकबस्टर; प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून खुलासा
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
Ranveer Singh
कल्की चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “त्या प्रत्येक क्षणाला…”
Kalki 2898AD
‘कल्की 2898 एडी’च्या दिग्दर्शकाचा प्रेक्षकांना सुखद धक्का; प्रभास, बिग बींसह दिसला ‘हा’ सुपरस्टार
Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुळजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले ‘इतक्या’ कोटींना, आकडा ऐकून व्हाल थक्क

शुक्रवारी या चित्रपटाचा ॲडव्हान्स बुकिंगला भारतात सुरुवात झाली. आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंग मधून या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची २ लाख ६५ हजार तिकीटं विकली गेली आहेत. हा आकडा ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगपेक्षाही जास्त आहे. ‘आरआरआर’च्या प्रदर्शनावेळी या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची १ लाख ५ हजार तिकीटं विकली गेली होती. आता त्याहून दुप्पट तिकीटं विकून शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाने याबाबतीत ‘आरआरआर’ला मागे टाकलं आहे. त्याचप्रमाणे आज आणि उद्या या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू राहील. त्यामुळे या दोन दिवसात हा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चाही रेकॉर्ड मॉडेल असं बोललं जात आहे.

हेही वाचा : ‘पठाण’च्या पहिल्या शोची तिकिटं मिळत नसल्याने चाहत्याने थेट घेतली किंग खानकडे धाव, अजब मागणी ऐकून शाहरुख म्हणाला…

या चित्रपटातून शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परतताना दिसणार आहे. यात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता जॉन अब्राहम याची या चित्रपटात नकारात्मक भूमिका आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानही कॅमिओ करताना दिसणार आहे.