शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दृश्यांमुळे हा चित्रपट गेले अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. परदेशात नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादाचा ‘पठाण’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये. नुकतंच या चित्रपटाचं जर्मनीत ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं. चित्रपट प्रदर्शित व्हायला महिना असताना या चित्रपटाची तिकीट बुक करण्यासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी जर्मनीत गर्दी केली आहे.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

आणखी वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

कालच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जर्मनीत सुरुवात झाली. क्षणार्धात या चित्रपटाची मोठ्या संख्येने तिकीट विकली गेली. या बुकिंगचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जर्मनीतील काही प्रसिद्ध मल्टिप्लेक्सच्या साईटवर ही तिकीटं उपलब्ध झाली आहेत. तर ‘पठाण’चे जर्मनीतील पहिल्या दिवशीचे सगळेच शो हाऊसफुल झाले आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, भारतातील या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग जानेवारीच्या मध्यात सुरू होईल.

हेही वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले ‘इतक्या’ कोटींना, आकडा ऐकून व्हाल थक्क

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.