अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. हा संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्याप्रकरणी आता माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘पठाण’ चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी याबाबत निवेदन दिले. मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपट परीक्षणाची प्रक्रिया कसून पार पाडली जात आहे. या समितीने ‘पठान’ चित्रपटात आणि गाण्यात काही बदल सुचवले आहेत. ते बदल करून चित्रपट प्रदर्शनाआधी नव्याने परीक्षण समितीकडे पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. चित्रपटकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास कायम राहिला पाहिजे, त्या दृष्टीने चित्रपटकर्मीनीही प्रयत्न केले पाहिजेत, असे जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘पठाण’ आणि दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद; सेन्सॉर बोर्डाचा मोठा निर्णय

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल हे नियमाला धरुन नाहीत. ‘पठान’ चित्रपट वादाचा बळी ठरत आहे. दबावाखाली परिनिरीक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असावा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मंत्रालयाकडून मंडळाला पत्रे पाठविली जातात. मात्र, एखाद्या रंगामध्ये बदल करावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना नाही. बीभत्सपणा किंवा अश्लीलता असल्यास तुम्ही बदल सुचवू शकता, असे त्यांनी यावेळी म्हटले.

आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.