scorecardresearch

‘पठाण’च्या कमाईची सर्वत्र होत असली तरी वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये ‘हा’ भारतीय चित्रपट आहे पहिल्या स्थानावर

जगभरातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिलं येण्यासाठी ‘पठाण’ला अजून भरपूर कमाई करावी लागणार आहे.

pathaan starcast
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. हा चित्रपट जगभरातून उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. ७ दिवसांमध्ये ६०० कोटींची कमाई करण्यापासून हा चित्रपट किंचित दूर आहे. पण वर्ल्डवाईड कमाईच्या बाबतीत ‘पठाण’च्या पुढे अनेक भारतीय चित्रपट आहेत.

‘पठाण’ने जगभरात ५०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. त्यापैकी भारतातील या चित्रपटाची कमाई ही ३३५ कोटी आहे. सोमवारपर्यंत या चित्रपटाने जगभरात २९७ कोटीची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ५४२ कोटींची कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाने ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडला. सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंग करणार भारतीय चित्रपट हा ‘बहुबली २’चा रेकॉर्ड ‘पठाण’ने मोडला. तर जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पठाण’ लवकरच ‘बाहुबली १’ला मागे टाकणार आहे. ‘बाहुबली १’ चित्रपटाने जगभरातून ५९९.७२ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : Video: आमिर खानने गायलं त्याच्या सुपरहिट ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील ‘हे’ लोकप्रिय गाणं, व्हिडीओ व्हायरल

‘पठाण’ची सर्वत्र वाहवा होत असली तरी जगभरातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिलं येण्यासाठी त्याला अजून भरपूर कमाई करावी लागणार आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट. या चित्रपटाने जगभरातून २०२३.८१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर त्या खालोखाल ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ या चित्रपटांचा नंबर लागतो. त्यामुळे आता ‘पठाण’ या चित्रपटांना मागे टाकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचा : “‘पठाण’पेक्षा ‘झिरो’ चांगला होता…”; चाहत्याच्या थेट प्रतिक्रियेवर किंग खानच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाला…

दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतातून ५० कोटी तर जगभरातून १०० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केलं होतं. या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:23 IST