scorecardresearch

‘पठाण’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क

या चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

‘पठाण’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क

शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर नाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. प्रदर्शनानंतर काही तासातच या ट्रेलरने यू ट्यूबवर काही मिलियन व्हूज मिळवले. तर आता नुकताच हा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला.

या वेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बुर्ज खलिफावर पठाणच्या ट्रेलरचा स्क्रीनिंग केलं जात असताना शाहरुख खानही तिथे उपस्थित होता. या वेळेचा शाहरुखचा उत्साह पाहून सर्वच थक्क झाले. ट्रेलर बघताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच होता पण त्याचबरोबर या चित्रपटाच्या गाण्यांवरही तो तिथे थिरकला.

आणखी वाचा : जॉन अब्राहम शाहरुख खानवर नाराज? अभिनेत्याच्या कृतीने वेधलं लक्ष

हा ट्रेलर पाहण्यासाठी आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दुबईतील त्याचे असंख्य चाहते तिथे आले होते. किंग खानला बुर्ज खलिफावर झळकताना पाहून ते सर्वजणही फार खुश होते. त्याच बरोबर हा ट्रेलर पाहताना खुद्द किंग खान तिथे उपस्थित असल्याने त्यांच्यासाठी ते क्षण खास होते. त्यामुळे हा ट्रेलर बुर्ज खलिफावर पाहणं ही तिथे उपस्थित सर्वांसाठी एक खास ट्रीट होती.

हेही वाचा : ‘पठाण’ चित्रपटातील ‘ही’ गोष्ट शाहरुख खानला सर्वात जास्त आवडली, खुलासा करत अभिनेता म्हणाला…

दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका सकारत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ‘पठाण’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झाला झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 10:06 IST

संबंधित बातम्या