Piyush Mishra Personal Life: पीयूष मिश्रा अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात, मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रात त्यांनी शालेय जीवनातील एक धक्कादायक प्रसंग मांडला आहे. १० वीत असताना पीयूष केरळच्या ‘मिस जिंजर’ या शिक्षिकेच्या प्रेमात पडले होते. ही जवळीक इतकी वाढली की एकांतात गाणी गाताना त्यांनी एकमेकांना किस केले होते. मात्र, ही बाब उघड होताच पीयूष यांना वडिलांनी बेदम मारलं होतं आणि त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. इतकंच नाही तर, मावशीने केलेल्या लैंगिक शोषणाबद्दलही त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.
या पुस्तकात पीयूष यांनी ते पहिल्यांदा प्रेमात पडले, त्यावेळचा किस्सा सांगितला आहे. ते दहावीत होते. त्यावेळी ते त्यांच्या शिक्षिका मिस जिंजरच्या प्रेमात पडले होते. त्या मॅडम केरळच्या होत्या आणि खूप सुंदर होत्या. त्या अनेकदा पीयूषला बोलावून गाणी म्हणायला सांगायच्या. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. खाणे-पिणे सुद्धा एकत्रच होऊ लागले, त्या पीयूषला त्यांच्या राज्यातील पदार्थ बनवून खाऊ घालायच्या. दोघांची अशीच धमाल-मस्करी सुरू होती आणि त्या मॅडमनी पीयूषच्या गालावर किस केले होते. ‘तुझा जन्म १० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, असं त्या पीयूषला म्हणायच्या.
शाळेच्या मॅडमला केलेलं किस
एके दिवशी शाळेत मोजकेच लोक होते, विद्यार्थ्यांची गर्दी कमी झाली होती. त्या मॅडम नेहमीप्रमाणे पियूषची गाणी ऐकत होत्या. यावेळी दोघांच्याही मनात भावनिक गोंधळ सुरू होता, असंही पीयूष यांनी पुस्तकात म्हटलंय. गाणं गायल्यानंतर पीयूष भावूक झाले आणि त्या मॅडमही भावूक झाल्या होत्या. दोघांनी एकमेकांना ओठांवर किस केलं होतं. मात्र, शाळेत कोणीतरी हा प्रकार पाहिला पीयुषच्या कुटुंबीयांना कळवलं. त्यानंतर पीयूषला वडिलांनी काठीने मारलं होतं. या प्रकारानंतर त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्या मॅडमलाही सर्व काही सोडून आपल्या मूळ गावी केरळला जावं लागलं होतं.
मावशीनेच केलेलं पीयूष मिश्रांचं लैंगिक शोषण
दरम्यान, मावशीनेच लैंगिक शोषण केलं होतं, असंही पीयूष मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. पीयूष सातवीत असताना मावशीने लैंगिक शोषण केलं होते. आपल्या पुस्तकात आपण फक्त लोकांची नावं बदलली आहेत, पण गोष्टी जशाच्या तशा मांडल्या आहेत, कारण आता कोणाकडूनही बदला घेण्याचा त्यांचा उद्देश नाही.
या घटनेतून सावरण्यासाठी कलेची मदत झाली – पीयूष मिश्रा
“ही गोष्ट सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. मी सातवीत शिकत होतो आणि उन्हाळ्याचे दिवस होते. मी पुस्तकात फक्त सत्य लिहिलंय, पण नावं बदलली आहेत कारण मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. घटनेने मला हादरवून सोडलं. जे काही घडलं त्यामुळे मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. शारीरिक संबंध ही अशी गोष्ट आहे की, ज्याचा तुमचा पहिला अनुभव नेहमी चांगलाच असायला हवा. नाहीतर त्याची भीती आयुष्यभरासाठी मनात राहते आणि त्याचा त्रास होतो. त्या लैंगिक शोषणाने मला आयुष्यभरासाठी अस्वस्थ करून सोडलं. यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप मोठा काळ लागला आणि अनेक मित्रांची साथ लाभली. या भयंकर घटनेतून सावरण्यासाठी माझ्या अंगी असलेल्या कलेने मला खूप मदत केली,” असं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पीयूष मिश्रा यांनी सांगितलं होतं.
