काकूकडून लैंगिक शोषण, दहावीत असताना शिक्षिकेने केलं Kiss, घरी कळालं अन्…; प्रसिद्ध अभिनेत्याचं खासगी आयुष्य चर्चेत

या पुस्तकात पियुष यांनी ते पहिल्यांदा प्रेमात पडले, त्यावेळचा किस्साही सांगितला आहे.

Piyush-Mishra-on personal life
(पियुष मिश्रा)

प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पियुष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ते संगीतकारही आहेत, तसेच ते कविताही लिहितात. पियुष मिश्रा यांनी आपल्या जीवन प्रवासाला पुस्तकाचे रूप दिले आहे. पियुष यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याला ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ असं नाव दिलंय.

“जसजसा मी मृत्यूजवळ…” प्रसिद्ध अभिनेत्याचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘आज तक’च्या वृत्तानुसार, या पुस्तकात पियुष यांनी ते पहिल्यांदा प्रेमात पडले, त्यावेळचा किस्साही सांगितला आहे. पियुष दहावीत होते. त्यावेळी ते त्यांच्या शिक्षिका मिस जिंजरच्या प्रेमात पडले होते. त्या मॅडम केरळच्या होत्या आणि खूप सुंदर होत्या. त्या अनेकदा पियुषला बोलावून त्यांना गाणी म्हणायला सांगायच्या. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. खाणे-पिणे सुद्धा एकत्रच होऊ लागले, त्या पियुष यांना त्यांच्या राज्यातील पदार्थ खाऊ घालायच्या. अशातच दोघांची धमाल-मस्करी सुरू होती आणि त्या मॅडमनी पियुष यांच्या गालाचे चुंबन घेतले होते. ‘तुझा जन्म १० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, असं त्या पियुष यांना म्हणायच्या.

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

एके दिवशी शाळेत मोजकेच लोक होते, विद्यार्थ्यांची गर्दी कमी झाली होती. त्या मॅडम नेहमीप्रमाणे पियुष यांची गाणी ऐकत होत्या. यावेळी दोघांच्याही मनात भावनिक गोंधळ सुरू होता, असंही पियुष यांनी पुस्तकात म्हटलंय. गाणे गायल्यानंतर पियुष भावूक झाले आणि त्या मॅडमही भावूक झालेल्या व त्यांनी एकमेकांना ओठांवर किस केलं होतं. मात्र, शाळेत कोणीतरी हा प्रकार पाहून पियुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पियुष यांना वडिलांनी काठीने मारलं होतं. या प्रकारानंतर त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आणि त्या मॅडमलाही सर्व काही सोडून आपल्या मूळ गावी केरळला जावे लागले.

विवाहित महेश भट्ट पडलेले सोनी राजदान यांच्या प्रेमात; वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आलिया भट्ट म्हणालेली, “मी माणसं…”

दरम्यान, काकूकडून लैंगिक शोषण केले होते, असंही पियुष मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:43 IST
Next Story
शाहरुख खानच्या मैत्रीमुळेच प्रियांकाला बॉलिवूड सोडावे लागले? कंगनाच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण
Exit mobile version