Rakul Preet-Jackky Bhagnani Wedding: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गोव्यात शीख आणि सिंधी रितीरिवाजानुसार दोघांचं थाटामाटात लग्न झालं. या लग्नाला बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न रकुल व जॅकीचं झालं. आयुष्यातल्या या खास क्षणासाठी दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं. अशातच आता पंतप्रधान मोदींनी या नवविवाहित जोडप्यासाठी पत्र लिहित त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

अभिनेता जॅकी भगनानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पत्रात पंतप्रधान मोदींनी रकुल व जॅकीला आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी लग्नाचं निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. रकुल व जॅकीने या खास पत्रासाठी मोदींचे देखील आभार मानले आहेत.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

हेही वाचा – दगडूच्या प्राजूला लागली हळद; होणाऱ्या बायकोचे हळदीचे फोटो पाहून प्रथमेश परब म्हणाला, “चल पटकन…”

“आम्ही पंतप्रधान मोदींच्या पत्राची फ्रेम करणार”

जॅकीचे वडील वायू भगनानी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दचं नाहीयेत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या या खास पत्राची फ्रेम करणार आहोत. जेणेकरून या शुभेच्छा नवविवाहित जोडप्याबरोबर कायम राहतील. मी हा क्षण कधीच विसरू शकत नाही.”

हेही वाचा – सुरेश वाडकरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान, म्हणाले, “मी खूप…”

दरम्यान, रकुल व जॅकीच्या लग्नाला वरुण धवन-नताशा दलाल, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, अनन्या पांडे असे अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.