Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाबद्दल सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. तसेच कालच या चित्रपटामधील ‘पीलिंग्स’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचं हे गाणं पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. अशात अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

हिंदुस्थान टाइम्सने आधन तेलुगूच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन विरोधात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. श्रीनिवास गौड असं या व्यक्तीचं नाव असून हैदराबादच्या जवाहर नगर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. अल्लू अर्जुनने असं केलं तरी काय, की त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली; त्याचीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : Video: ‘फुलवंतीआणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘मदनमंजिरी’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स

ग्रीन पीस एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर हार्वेस्टिंग फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास गौड यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, “आम्ही दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी वापरलेला शब्द आम्हाला आवडलेला नाही. तो एक आदरयुक्त आणि सन्मानजनक शब्द आहे, त्यामुळे तो फक्त देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींसाठी वापरला जातो. त्यामुळे अल्लू अर्जुन त्याच्या चाहत्यांसाठी हा शब्द वापरू शकत नाही, त्याने दुसरा शब्द वापरावा.”

नेमकं काय म्हणाला अल्लू अर्जुन?

सध्या अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात फार व्यग्र आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्याने प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे. प्रमोशनवेळी चाहत्यांचे प्रेम पाहून अल्लू अर्जुन म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांवर फार प्रेम करतो. माझ्याकडे चाहते नाही तर एक आर्मी आहे, ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत. त्यामुळे ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात आणि आनंद साजरा करतात. माझे चाहते नेहमीच आर्मीप्रमाणे माझ्याबरोबर असतात. जर हा चित्रपट हिट झाला तर त्याचं श्रेय मी माझ्या चाहत्यांनाच देईन.”

हेही वाचा : “कुछ तो गडबड है दया”! शिवाजी साटम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सीआयडी’चं नवीन पर्व ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांसाठी आर्मी हा शब्द वापरला आहे, त्यामुळे यावर काही नेटकरी नाराज असून श्रीनिवास गौड यांनी थेट यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader