Pooja Bhatt on chemistry with Aamir Khan: कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबर त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. ते त्यांच्या सहकलाकारांबद्दल, बॉलीवूडमधील विविध कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात.

सध्या पूजा भट्ट तिच्या एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेकविध विषयांवर वक्तव्य केले. तिने बॉबी देओलबरोबरचे नाते, त्यांच्याबरोबरचे ब्रेकअप तसेच तिच्या कुटुंबाबद्दल, सावत्र बहिणी आणि तिच्या करिअरबद्दल वक्तव्य केले. तसेच, तिने आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच त्यांच्यातील केमिस्ट्रीबद्दलही वक्तव्य केले. अभिनेत्री आमिर खानबद्दल नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“जेव्हा कॅमेरा सुरू व्हायचा त्यावेळी आम्ही…”

पूजा भट्ट व आमिर खान यांनी ‘दिल हैं कि मानता नहीं’ या सिनेमात एकत्र काम केले आहे. अभिनेत्रीने या सिनेमाची आठवण सांगितली. पूजा भट्ट म्हणाली, “आमिर त्याच्या सीनचा सराव करत असे. काहीजण त्याला इतरांच्या कामात ढवळाढवळ करणारा म्हणतील किंवा ज्याला सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीत रस असतो असा व्यक्ती म्हणतील. तो विचारायचा की तू उंच टाचेच्या चपला का घातल्या आहेस? ते पात्राला शोभत नाही. मी त्याच्याकडून खूप काही शिकले. त्याची अभिनयातील अचूकता, तो अभिनेता म्हणून परफेक्ट आहे.”

आमिर खानबरोबरच्या मैत्रीबद्दल ती म्हणाली, “तो कायमच बरोबर बोलायचा किंवा त्याला सगळंच माहीत असायचं असं नव्हतं. आम्ही एकमेकांची खूप मस्करी करायचो.”

या मुलाखतीत तिला विचारले की, आमिर खान तुझ्याकडे आकर्षित झाला होता असे म्हटले जायचे, तर तसे होते का? यावर पूजा म्हणाली, “तुम्ही हा प्रश्न आमिरला विचारला पाहिजे. मी छान दिसायचे, मग तो माझ्याकडे आकर्षित झाला असेल तर त्याला दोष द्याल का?” तिला विचारले की तू आमिरकडे आकर्षित झाली होतीस का? त्यावर पूजा म्हणाली, “जेव्हा कॅमेरा सुरू व्हायचा त्यावेळी आम्ही एकमेकांच्या प्रेमात असायचो.” म्हणजेच सीन पुढे ती असेही म्हणाली, “आमच्यात चांगली केमिस्ट्री होती, पण त्याचे प्रेमात किंवा नात्यात रूपांतर झाले नाही.”

त्यावेळी आमिरचे आधीच रीना दत्ता यांच्याशी लग्न झाले होते. १९८६ मध्ये त्यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते. त्यांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आमिर खानने किरण रावबरोबर लग्न केले. लग्नाच्या १५ वर्षांनंतर त्याने घटस्फोट घेतला. आता तो गौरी स्प्रॅटबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.