अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. गरोदर दीपिकाने मुंबईत ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमात ती खूपच सुंदर दिसत होती. कार्यक्रमातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात चित्रपटातील मुख्य अभिनेता प्रभास आणि महानायक अमिताभ बच्चन दीपिकाला स्टेजवरून उतरण्यास मदत करण्यासाठी धावताना दिसत आहेत. या दोघांपैकी कोण जिंकलं, ते पाहुयात.

या कार्यक्रमात काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोहोचलेली दीपिका बेबी बंपसह खूप सुंदर दिसत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेव्हा दीपिकाने एंट्री घेतली तेव्हा तिला बिग बींनी स्टेजवर चढण्यास मदत केली होती. बिग बींनी तिचा हात पकडून आधार दिला आणि दीपिका स्टेजवर पोहोचली. नंतर स्टेजवर प्रभास तिची खुर्चीवर बसण्यास मदत करताना दिसला.

दीपिका पदुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नन्सी ग्लो

स्टेजवर आल्यावर दीपिकाने चित्रपटात साकारलेल्या तिच्या पात्राची थोडक्यात ओळख करून दिली. तिने दिग्दर्शक नाग अश्विनबरोबर काम करण्याबद्दल सांगितलं. हा एक उत्तम अनुभव होता आणि खूप काही शिकायला मिळालं, असं तिने नमूद केलं. “हा एक अविश्वसनीय अनुभव होता. मिस्टर बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे, हे पूर्णपणे नवीन जग आहे. हा चित्रपट कशाबद्दल आहे हे शोधण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेलो, मला वाटतं की दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली जादू आता सर्वांना पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या हा एक खूपच वेगळा अनुभव होता,” असं दीपिका म्हणाली.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

बोलून झाल्यावर दीपिका स्टेजवरून उतरणार होती तेव्हा प्रभास आणि अमिताभ दोघेही तिला मदत करण्यासाठी धावले. मात्र प्रभास आधी पोहोचतो आणि तिचा हात पकडतो आणि तिला आरामात स्टेजवरून खाली उतरण्यास मदत करतो, त्यानंतर बिग बी मस्करी करत प्रभासला पकडतात. हे पाहून उपस्थित प्रेक्षकही हसू लागले. या मजेदार क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाले असून चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण यांच्यासह कमल हासन आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अंदाजे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन अश्वत्थामा ही भूमिका साकारणार आहेत.