मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या काही तास आधीच या चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला असून त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाच्या ट्रेलरकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली. काल म्हणजेच ट्रेलर प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या काही खास चाहत्यांसाठी या चित्रपटाच्या ट्रेलरचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. याच दरम्यान काहींनी हा ट्रेलर त्यांच्या मोबाइलवर शूट केला.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात गेलेले दिसत आहेत, राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. त्यानंतर हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता देवदत्त नागेची एन्ट्री या ट्रेलरमध्ये होते आणि तो लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना या ट्रेलरमध्ये दाखवला गेला आहे. यानंतर राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून श्रीलंकेला जाताना दिसत आहेत. यानंतर या ट्रेलरमध्ये वानरसेना आणि लक्ष्मणाच्या सैन्यांमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. तरी या ट्रेलरच्या शेवटी रावणाची एन्ट्री होते. गेल्या वर्षी या चित्रपटावर झालेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटातील रावणाचा लुकही बदलण्यात आला असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

हेही वाचा : ओम राऊतने उघड केलं ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गुपित; म्हणाला, “‘मार्व्हल’ आणि ‘अवतार’ सारखे…”

या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. पण या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटावर टीका केली गेली. या केल्या गेलेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.