बिग बजेट ‘आदिपुरुष’ चित्रपट टीझरपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील रावणाच्या भूमिकेत असलेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या लूकवरून टीका होताना दिसत आहे. तर टीझरमधील व्हीएफएक्समुळेही चित्रपट नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगच्या निशाण्यावर आहे. आता चित्रपटाच्या पोस्टरबाबत चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टवरवर चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास रामाच्या लूकमध्ये आहे. हे पोस्टर कॉपी केलं असल्याचा दावा ‘वानरसेना स्टुडिओ’कडून करण्यात आला आहे. या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने शंकराच्या लूकमधील एक पोस्टर तयार केलं होतं. त्या पोस्टरवरून ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर कॉपी करण्यात आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी याबाबत स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्यांनी “टी सीरिज ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या पोस्टरवरुन प्रभावित होऊन तुम्ही चित्रपटाचे पोस्टर तयार केले, त्यांना क्रेडिट द्यायला हवं होतं”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, मात्र प्रभास-सैफ अली खानने घेतलं कोट्यवधी रुपयांचं मानधन

‘आदिपुरुष’ चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सिता’ हे पात्र ती साकारणार आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेता सनी सिंग चित्रपटात ‘लक्ष्मणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ‘हनुमाना’ची भूमिका साकारली आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

टीझरपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला आता राजकारण्यांनीही विरोध करायला सुरुवात केली आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी हिंदूंच्या भावना दुखावणारे सीन चित्रपटातून काढून टाकले नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas saif ali khan starrer adipurush poster copied claim by animation studio kak
First published on: 06-10-2022 at 15:44 IST