दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा एक छोटासा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यावरून प्रचंड गदारोळ माजला. यातील स्पेशल इफेक्ट आणि रावणाचा लूक यावरून लोकांनी या टीझरला प्रचंड ट्रोल केलं. हा चित्रपट बॉयकॉट करावा इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या. यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

दरम्यान या चित्रपटाच्या काही सीन्समध्ये बदल करण्यात आल्याची बातमीदेखील समोर आली होती, पण या चित्रपटाचे छायाचित्रकार यांनी ती बातमी खोटी असल्याचा दावा केला. एकंदरच चित्रपटाचा टीझर पाहून प्रभू श्रीराम यांना चुकीच्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करत असल्याचं लोकांनी सांगितलं आणि त्यांचा विरोध दर्शवला.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Shah Rukh Khan shared Mohanlal Zinda Banda dance moves viral video
‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ गाण्यावर थिरकले सुपरस्टार मोहनलाल; शाहरुख खान म्हणाला, “मी तुमच्याइतकं जरी चांगलं…”
Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
salman khan house firing
दोघांना १० राउंड फायरिंगचे आदेश, पण ऐनवेळी…; आरोपींनी वापरलेली बंदूक नदीतून जप्त, जिवंत काडतूसही सापडले

आणखी वाचा : “आपण भविष्यात काम…” ‘वीर जारा’ चित्रपटावेळी यश चोप्रा चोप्रांनी मनोज बाजपेयी यांना स्पष्टच सांगितलेली ‘ही’ गोष्ट

आता मात्र टी-सिरिज आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. या फोटोमध्ये टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि दिग्दर्शक ओम राऊतही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट शेअर करत ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

हा चित्रपट सर्वप्रथम ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही तांत्रिक कारणास्तव आणि लोकांचा विरोध पाहता याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटात प्रभास हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर सीता मातेच्या भूमिकेत क्रीती सनॉन झळकणार आहे. याबरोबरच सैफ अली खान यात रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ओम राऊत यांनी याआधी ‘लोकमान्य एक युगपुरुष’ आणि ‘तान्हाजी’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.